महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू - ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

श्रम भारतीय जनता कामगार महासंघ संलग्न इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन संघटनेची ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासमवेत बैठक संपन्न

मुंबई : महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचारी हे अत्यंत महत्त्वाचे काम करणारे घटक असून, त्यांच्याशी संबंधित प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोडीकर यांनी आश्वासन दिले. फोर्ट येथील ऊर्जा विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत लाईनस्टाफ कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या. या बैठकीस महावितरणचे संचालक प्रदीप भागवत यांच्यासह आदि उपस्थित होते.

    या बैठकीत ॲनामली कमिटीमधील प्रलंबित प्रश्नामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ पदाचा वेगळा दर्जा निश्चित करण्यात यावा म्हणजे वर्ग ४ श्रेणीमधून वर्ग ३ मध्ये करण्यात यावा. तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व प्रधान तंत्रज्ञ, मुख्य तंत्रज्ञ या श्रेणीतील कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ ही ३ टक्क्यापेक्षा कमी आहे ती ४ टक्के पर्यंत वाढविण्यात यावी. महावितरण कंपनीतील कार्यरत विद्युत सहाय्यक यांचा प्रशिक्षण कालावधी हा पदोन्नती बदली व सेवा काळात गृहित धरण्यात यावा. महावितरण कंपनीने कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधित वेगवेगळ्या निर्गमित केलेल्या परिपत्रकांचे / धोरणांचे स्थानिक पातळी कार्यालयापर्यंत अंमलबजावणी करण्यात यावी. लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून व अपघात शून्य दृष्टीकोनातून अत्याधुनिक आवश्यक सुरक्षा साधने देणेबाबत उचित कार्यवाही करण्यात यावी. 

     लाईन स्टाफ कर्मचारी हा अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने त्याला २४/७ सेवा देणे अभिप्रेत असते परंतु त्याने केलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला दिला जात नाही तसेच ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना रात्र पाळीचा भत्ता दिला जात नाही त्यामुळे लाइन स्टाफ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा व रात्र पाळी कामाचा मोबदला लागू करण्यात यावा यासारखे लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

     यावेळी श्रम भारतीय जनता कामगार महासंघ संलग्न इलेक्ट्रिसिटी लाइन स्टाफ असोसिएशन संघटना समवेत राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ऊर्जा विभाग, महिला व बाल विकास विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग तथा पालकमंत्री परभणी मा. ना. सौ. मेघनाताई साकोरे / बोर्डीकर यांचे अध्यक्षतेखाली महावितरण प्रशासन समवेत लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. 

     प्रशासनाच्या वतीने कार्यकारी संचालक (मास) परेश भागवत, ज्योती चिमटे महिला संचालक (स्वतंत्र) महावितरण, अविनाश निंबाळकर संचालक (प्रकल्प) (प्रभारी) महापारेषण, कार्यकारी संचालक परेश भागवत महावितरण, आनंद कोतं मुख्य महाव्यवस्थापक महाजनरेशन, सुमित गमरे मुख्य महाव्यवस्थापक महापारेषण, महानिर्मिती कार्यकारी संचालक, कावळे मुख्य अभियंता महावितरण, संजय ढोके मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, भरत पाटील औद्योगिक संबंध अधिकारी महापारेषण व इतर अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

     श्रम भारतीय जनता कामगार महासंघ यांचे वतीने गणेश ताटे, प्रदेश प्रभारी कामगार आघाडी, अमित कदम सरचिटणीस, अमित भोसले, प्रमोद जाधव, चंद्रकांत महाडिक, डॉ. अमित भोसले, सचिनदाजी पाटील.  इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशन संघटनेच्या वतीने सरचिटणीस राज् अती मुला, कोषाध्यक्ष आदिनाथ पवार, उपाध्यक्ष अशोक फाळके, उपसरचिटणीस ईश्वरसिंग टेलर, उपसरचिटणीस महावीर जाधव, प्रादेशिक संघटक सतीश माने, प्रादेशिक कार्याध्यक्ष गजानन राऊत व इतर पदाधिकारी चर्चेकरिता उपस्थित होते.

    जिल्हा परिषद अंतर्गत अर्धवेळ परिचार महिला यांचे पगार चार महिने झाले नाहीत ते तात्काळ जमा करावे ही विनंती केली याबाबत मंत्री यांनी तात्काळ सुचना शासकीय अधिकारी यांना सुचना केल्या. तसेच महिलांना ऑर्डर प्रमाणे काम करुन घ्यावे असे आदेश लवकरच काढू असे आश्वासन मंत्री यांनी दिले.