पुणे : पिंपरी येथील एलांटास बेक इंडिया लिमिटेड (Elantas Beck India Limited) कंपनी व्यवस्थापन आणि एलांटास बेक कामगार संघटना (Elantas Beck Employee Union ) यांच्यामध्ये वेतनवाढ करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात दिनांक: २० मे २०२५ रोजी संपन्न झाला.
वेतन कराराची ठळक वैशिष्टे :
कराराचा कालावधी : तीन वर्ष असेल (दि.०१ जानेवारी २०२५ ते दि.३१ डिसेंबर २०२७)
प्रथम वर्ष : रुपये २४०३०/- ( CTC)
दुसरे वर्ष: रुपये १३३५/-
तिसरे वर्ष: रुपये १३३५/-
फरक रक्कम : दि.१ जानेवारी २०२५ पासून ते दि.३१ मे २०२५ पर्यंत एक रकमी देण्याचे मान्य करण्यात आले.
रजा :- वार्षिक हक्काची साठवण्याची मर्यादा ६० रजा करण्यात आलेली आहे.
बिनव्याजी फेस्टिवल एडव्हांस :- रुपये ३६,०००/- करण्यात आली व त्याची परतफेड एक वर्षात करण्यात येणार आहे.
१) वैद्यकीय कारणाकरता १० लाख करण्यात आलेले आहे.
२) अकाली निवृती या कारणाकरता १० लाख करण्यात आलेले आहे.
शैक्षणिक शिष्यवृत्ती :- प्रति वर्ष दहा कामगारांच्या मुलांना प्रत्येकी १००००/- रुपये हे विनापरतावा शिष्यवृत्ती देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केलेले आहे ही योजना नव्याने असून सदर करारनामा झाल्यापासून सर्व कामगारास लागू राहील.
आपात्कालीन वैद्यकीय मदत :- १ महिन्याचा बेसिक दोन महिने देण्यात येणार आहे सदरची योजना देखील नव्याने चालू करण्यात आलेली आहे.
ग्रुप टर्म इन्शुरन्स :- ही योजना नव्याने चालू करण्यात आली असून प्रत्येक कामगारास वार्षिक ३ times of CTC देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केलेले आहे.
आपातकालीन वैद्यकीय रजा :- कंपनीच्या बाहेर जर काही अपघात घडल्यास केस टू केस बेसिस वरती वैद्यकीय रजा देण्याचे व्यवस्थापनाकडून मान्य करण्यात आलेले आहेत. ही देखील योजना नव्याने चालू करण्यात आलेली आहे.
वार्षिक इन्क्रिमेंट :- मूळ पगाराच्या तीन टक्के ही पद्धत आहे तशीच चालू ठेवण्यात आलेली आहे.
बदलता महागाई भत्ता :- आहे तसाच राहील.
तसेच मागील सर्व चालू सोई-सुविधा यापुढे देखील अशाच चालू राहतील.
करारावेळी व्यवस्थापनाच्या वतीने श्री कलीम उद्दीन (व्हॉइस प्रेसिडेंट), श्री मिलिंद प्रभुणे (फॅक्टरी मॅनेजर), श्री अभिजीत वाघ (प्रोडक्शन हेड), श्री सचिन गायकवाड (डेप्युटी मॅनेजर एच आर & आय आर), श्री बाबासाहेब खंडाइत (हेड स्टोअर्स) यांनी तसेच एलांटास बेक एम्प्लॉईज युनियन तर्फे श्री. विशाल शेटे (अध्यक्ष), श्री. विष्णुदास तोरणे (उपाध्यक्ष), श्री नंदकुमार चव्हाण (सचिव), श्री राहुल शिवरकर (सहसचिव), श्री लीलाधर किरंगे (खजिनदार), श्री बसवंत हेगडे (सदस्य), श्री संदीप कानडे (सदस्य) यांनी स्वाक्षरी केली. यावेळी करार यशस्वी होण्याकरता प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.