कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी भव्य मोटारसायकल रॅली

विजयनगरम : अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाची (संलग्न भारतीय मजदूर संघ) राष्ट्रीय कार्यकारिणीची दुसऱ्या दिवसाची बैठक विजयनगरम, आंध्र प्रदेश येथे जोशात पार पडली. सकाळी महेला फार्मास्युटिकल्स कंपनी परिसरात भारतीय मजदूर संघाचा झेंडा अनावरण करण्यात आला. त्यानंतर औद्योगिक वसाहतीतील कंत्राटी कामगारांनी शोषणाविरोधात आणि मूलभूत हक्कांसाठी एक भव्य मोटारसायकल रॅली काढली.

    रॅली BSNL कार्यालय आणि Collector कार्यालय मार्गे Youth Hostel येथे पोहचली. "किमान वेतन ₹26,000 द्यावे!", "ESI मर्यादा ₹42,000 पर्यंत वाढवा!", "PF लागू करा!", "शोषण थांबवा!" अशा जोशपूर्ण घोषणा देत परिसर दणाणून गेला.

महत्त्वपूर्ण मागण्या:
1. केंद्र सरकारने ESIची वेतनमर्यादा ₹21,000 वरून ₹42,000 पर्यंत वाढवावी.
2. किमान वेतन ₹26,000 प्रति महिना निश्चित करावे.
3. PF, बोनस, गॅच्युइटी आणि इतर कायदेशीर हक्क तातडीने लागू करावेत.
4. कंत्राटी कामगारांना स्थिर रोजगार देण्यात यावा.
5. भारतीय मजदूर संघासोबत त्वरित बैठक घेऊन निर्णय जाहीर करावा.

जर सरकारने लवकरात लवकर सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर संपूर्ण देशात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी महासंघाने दिला.

    मोर्चात नेतृत्व करणारे प्रमुख पदाधिकारी: कंदी श्रीनिवासन – अध्यक्ष, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सचिन मेंगाळे – सरचिटणीस के. व्ही. राधाकृष्णन –सह प्रभारी डॉ. अ‍ॅलपी राजू – जिल्हा संयोजक, विजयनगरम आणी विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांसह सत्यव्रत स्वाई ,सत्यनारायण ,मलय ,अनिकेत चक्रवर्ती कल्याण चौधरी , मोर्चात शेकडो कामगार ऊत्स्फूर्तीने सहभागी झाले होते.

    तसेच महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांसाठी ईएसआय कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल असे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले तसेच सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद ची अपेक्षा व्यक्त केली.