पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंट (NIPM) च्या पिंपरी-चिंचवड-चाकण विभागाच्या २०२५–२०२७ या कालावधीसाठी झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत हॉटेल क्रियाड येथे झालेल्या मतमोजणी मध्ये भक्ती शक्ती HR प्रोग्रेसिव्ह पॅनलने सर्व १० जागांवर विजय मिळवत एकहाती यश संपादन केले आहे. दि.२२ ते २८ जून २०२५ दरम्यान निवडणूक प्रक्रिया पार पडली, आणि दि.२९ जून २०२५ रोजी निकाल जाहीर करण्यात आला.
या निवडणुकीत चेअरमन नवनाथ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती शक्ती एच आर प्रोग्रेसिव्ह पॅनल चे प्रदीप मानेकर यांची अध्यक्षपदी, अर्जुन माने यांची उपाध्यक्षपदी, नवनाथ सूर्यवंशी यांची सन्माननीय सचिवपदी, राहुल निंबाळकर यांची अतिरिक्त सचिवपदी, आणि व चाप्टरच्या प्रथम महिला म्हणून प्रीती पाटील यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून अमित देशपांडे, अनु सेठी, महेंद्र फणसे, निलेश नाफडे आणि संपत पारधी यांची निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे NIPM च्या भारतभर 56 शाखा असून पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर हा एकमेव चाप्टर आहे ज्याचे सर्वच्या सर्व सदस्य हे विविध नामांकित कंपन्यांमध्ये एच आर प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत व यामध्ये महिला प्रतिनिधींनाही सर्वाधिक स्थान देण्यात आले आहे.
चाप्टरच्या परिसराचे व्याप्ती पाहता या चाप्टरमध्ये पिंपरी चिंचवड, चाकण तळेगाव, पुणे, रांजणगाव, शिरवळ, सातारा, सांगली सह कोल्हापूर परिसरातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असणारे एच आर प्रतिनिधी यांचा प्रामुख्याने समावेश असून या चाप्टरच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती ही फार मोठी असून भविष्यातील इंडस्ट्रीज व त्याच्या प्रतिनिधी यांच्या सर्वांगीण विकासाकरता निपम पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर हा मोलाची भूमिका पार पडेल असे सर्व निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच तळेगाव चाकण ही एमआयडीसी राज्यातच नव्हे तर देशभरात सर्वात मोठी अशी औद्योगिक एमआयडीसी असून भविष्यात चाप्टरचे सदस्य वाढविण्याचे लक्ष हे असल्याचे व विचार प्रतिनिधींच्या हक्कासाठी व त्यांच्या उन्नतीसाठी काम करणार असल्याचे याप्रसंगी सांगितले.
ही निवडणूक विभागासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली असून, नवनिर्वाचित पॅनल एक प्रेरणादायी, विविध भूमिकांतील व पार्श्वभूमी असलेला संघ असून विभागात पुढील दोन वर्षांमध्ये नव्या उपक्रमांची, कौशल्य विकासाच्या आणि मानवी संसाधन व्यवस्थापनाच्या प्रगतीस चालना देणार आहे. पिंपरी-चिंचवड-चाकण विभागात HR क्षेत्राचा विकास आणि व्यावसायिक संवाद अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा विजय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व नीटनेटकी रित्या पार पडली, आणि यामध्ये निवृत्त कामगार उपायुक्त, डॉ. नागेश कुमार यांनी मुख्य निवडणूक अधिकारी या नात्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन हे एक्साइड बॅटरीज चे श्री संतोष चव्हाण यांच्या हस्ते एक्साइड कंपनीच्या व्यवस्थापनाच्या वतीने, तसेच पुणे चॅप्टरचे चेअरमन श्री कल्याण पवार व त्यांचे इतर सर्व सदस्य त्याचप्रमाणे निपमचे नॅशनल कौन्सिलचे सदस्य व पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर चे संस्थापक अध्यक्ष श्री अमोल कागवडे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य छत्रपती संभाजीनगर सुनील सुतावणे, रिजनल व्हाईस प्रेसिडेंट नरेंद्र पाटील, व्हायब्रंट एच आर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकर साळुंखे, माजी अध्यक्ष तुषार टोंगळे, अनिल भोईटे, दिग्विजय पिसाळ, आप्पा सामोरे, प्रणव बेहरे, सतीश पवार, वनराज भोसले, रमेश बागल त्याचप्रमाणे चाकण इंडस्ट्रियल असोसिएशन, तळेगाव इंडस्ट्रियल असोसिएशन, इंद्रायणी इंडस्ट्रियल असोसिएशन, सातारा इंडस्ट्री असोसिएशन, नीरा व्हॅली, कोल्हापूर इंडस्ट्री असोसिएशन आणि विविध कंपन्या काम करणाऱ्या एच आर प्रतिनिधी व राजकीय, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील नामांकित पदाधिकाऱ्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.