श्रमिक एकता महासंघाची १ मे जागतीक कामगार दिनानिमीत्त महारॅली व पुरस्कार वितरण सोहळा

पुणे : १ मे जागतिक कामगार व महाराष्ट्र दिनानिमीत्त श्रमिक एकता महासंघाच्या कामगारांविषयी सरकारची ऊदासिनता व भांडवलधार्जिणे धोरण या विषयी कामगारांमध्ये जागृती निर्माण करून कामगार चळवळीला दिशा देण्याच्या दृष्टिने गुरुवार दि.१ मे २०२५ रोजी पिंपरी चिंचवड शहरामध्ये महारॅलीचे आयोजन करण्यात आले.

     महारॅली सकाळी ठीक ८.३० वा. विश्वकल्याण कामगार संघटना कार्यालय (बजाज ऑटो) गेटपासून मोटरसायकल वरून सुरू झाली. निगडी चौक, पुणे-मुंबई हायवेने, खंडोबा माळ, थरमॅक्स चौक, कस्तुरी मार्केट, कृष्णानगर , शाहुनगर, के एस बी चौक, चिंचवड स्टेशन - आकुर्डी - दळवी नगर- बिजलीनगर मार्गे ग. दि. माडगूळकर सभागृह निगडी प्राधिकरण येथे सर्वजण एकत्र येत कामगार मेळावा आयोजीत करण्यात आला.

      कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन श्री भालचंद्र कांगो उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष मा. श्री. किशोर पाराजी सोमवंशी हे होते.श्रमिक एकता महासंघाचे महासचिव श्री. रोहीत पवार यांनी प्रस्ताविक केले.

     श्रमिक एकता महासंघाच्या माध्यमातुन कामगार लढे व कामगारांचा संघर्ष पत्रकारीतेच्या माध्यमातून पारदर्शकपणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून उल्लेखनीय कार्य केल्याबददल कामगार चळवळीचे जनक रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे हा पुरस्कार श्री. प्रदीप भूपाल लोखंडे (पत्रकार - दैनिक सकाळ) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच व्यवस्थापन आणि कामगार कर्मचारी यांच्यातील परस्पर संबंध सलोख्याचे ठेऊन फक्त कामगार, कर्मचाऱ्यांची भरभराट न होता उदयोगाचे हित जोपासुन आद्योगिक क्षेत्रात आदर्श ठेवत असल्यामूळे श्रमिक एकता महासंघाच्या वतीने "जागतिक कामगार दिनानिमित्त"  राजर्षी शाहु महाराज पुरस्कार देऊन श्री पार्थ कुलकर्णी व्हाईस प्रेसिडेंट HR शिंडलर इंडिया प्रा. लि. यांना गौरविण्यात आले.

श्रमिक एकता महासंघाच्या वतीने "लढाऊ कामगार संघटना" अशा संघटना की ते नेहमी कामगारांचे हित केंद्रस्थानी ठेवून पुढे वाटचाल करत असतात हा पुरस्कार हुंडाई एम्प्लॉईज युनियन ,चाकण व महाराष्ट्र एन्व्हायरो पावर कामगार संघटना, रांजणगाव यांना देण्यात आला.

    महासंघातील संलग्न संघटनांचे जेवढे वेतन वाढ करार झालेले आहेत या करारामध्ये सर्वच युनियनने आपल्या कंपनीचे बाजारपेठेतील स्थान अधिक भक्कम कसे करता येईल हा दृष्टिकोन पुढे ठेवून युनियनने एक स्मार्ट आणि प्रोग्रेसिव्ह युनियनची भक्कम बाजू दाखवून दिलेली आहे.

      श्रमिक एकता महासंघातील सर्वच संलग्न संघटना  सर्व सभासदांना सध्याच्या असलेल्या स्पर्धात्मक युगात कामगार संघटना व सर्व कामगार हे नेहमी स्मार्टवर्क, स्किल अपडेट कसे ठेवता येईल याबाबत ट्रेनिंग च्या साह्याने मार्गदर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण करत आहेत आणि हे साध्य करण्यासाठी महासंघ नेहमीच संलग्न संघटनांसाठी पुढे असतो. तसेच महासंघातील सर्व युनियन चिवट झुंज देत पुढे वाटचाल करत आहे. या सर्व संघर्षामध्ये सर्वच संलग्न संघटना सर्व प्रकारे खंबीरपणे पाठिंबा देत आहे ही बाब श्रमिकेतता महासंघासाठी अभिमानास्पद आहे.

   यामध्ये मुख्य करून शिरवळ येथील रिएटर इंडिया व नगर रोड येथील युनिपॉल इंडिया या कंपनी व्यवस्थापना चे अधिकारी कामगार विरोधी धोरण व व्यवस्थापनाच्या चालू असलेल्या बेकायदेशीररित्या चाललेल्या घडामोडी याची सविस्तर माहिती सर्वांना सांगण्यात आले

श्री दिलीप पवार ,श्री मारूती जगदाळे, श्री केशव घोळवे यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले तसेच श्री राजेंद्र पाटील व सचिन गुंडाळा यांनी उत्तमरीत्या सूत्रसंचालन प्रभावीपणे केले. श्रमिक एकता महासंघाच्या महिला आघाडी अध्यक्ष सौ विद्याताई तांबे यांनी आभार मानले.