विविध मागण्यांसाठी फिनले मिल कामगार चढले चिमणीवर

अचलपूर : कोरोनापासून बंद असलेल्या फिनले मिलच्या कामगारांनी मंगळवारी सकाळी सात वाजता मिलच्या २०० फूट उंच चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन पुकारले. २३ महिन्यापासून थकित असलेले बोनस, सहा महिन्यापासूनचा अर्धा पगार मिळावा व ठोस आश्वासन सीएमडीनेद्यावे याकरिता गिरणी कामगार संघाचे दोन आंदोलक चिमणीवर चढले असे वृत्त तरुण भारत नागपूर वृत्तसंस्थेने दिले आहे.

    थकित २३ महिन्याचे पूर्ण वेतन व सहा महिन्याचे अर्धवेतन त्वरित मिळावे याकरता गिरणी कामगार संघटनेचे मनोज सूर्यवंशी व विकी उघडे हे दोन कर्मचारी सकाळी सातच्या सुमाराला मिल परिसरातील २०० फूट उंच असलेल्या चिमणीवर चढल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. Sholay agitation for wages बघता बघता बातमी जुळ्या शहरात वार्‍यासारखी पसरली. कामगारांच्या आंदोलनाला सहकार्य करण्याकरिता शेकडो मिल कामगार परिसरात दाखल झाले. अचानक आंदोलनाला सुरुवात झाल्याने अचलपूर पोलिस व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

    कामगार संघटनेचे पदाधिकारी व मिल प्रशासन, पोलिस अधिकारी यांची आपसात झालेली चर्चा विफल ठरली. प्रशासनाने आंदोलन मागे घेण्याची विनंती केली तरी वस्त्रोद्योग दिल्ली येथील सीएमडी किंवा वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत ठोस निर्णय घेणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. आ. प्रवीण तायडे यांनीही आंदोलक कर्मचारी व नेत्यांशी चर्चा केली व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. Sholay agitation for wagesया आंदोलनात शेकडो मिल कामगार मिलच्या आत व गेटवर बसले असून बातमी लिहेस्तोवर कुठलाही तोडगा निघाला नव्हता. मिल प्रशासनाशी संपर्क केला असता, या संदर्भात आम्ही ठोस आश्वासन देऊ शकत नाही, वरिष्ठांशी संपर्क साधत आहोत, लवकर तोडगा निघेल, असे व्यवस्थापकांनी सांगितले.