पूना क्लब कामगारांचा ऐतिहासिक वेतन करार संपन्न

पुणे : पूना क्लब कामगार युनियन आणि पूना क्लब व्यवस्थापन यांच्यामध्ये आर्थिक वर्ष 2025 ते 2028  करिता वेतन करार मोठ्या उत्सहात पार पडला. पूना क्लबच्या 140 वर्षा च्या इतिहासात पहिली वेळ हा करार दिनांक 01 तारखेला पार पडला मागील करार दिनांक 31.03.2025 ला संपुष्टात आला आणि 01 .04.2025 ला नवीन करारावर स्वाक्षरी करण्यात आली . 

वेतन कराराची ठळक वैशिष्टे : 

करार कालावधी : दि. 1 एप्रिल 2025 ते दि. 31 मार्च 2028   

पगारवाढ : कामगारांच्या वेतनामध्ये तीन वर्षेकरिता रु.8500 /- 
वर्ष 2025 -26 करीता - रु.6000/- 
वर्ष 2026-27 करिता - रु.1500/-
वर्ष 2027-28 करिता - रु.1000/- 
या मध्ये 50% मूळ वेतन व 50% इतर अलाऊन्स मध्ये टाकण्यात आले.

करारामध्ये कामगारांना श्रेणी पध्दतीने वार्षिक वेतन वाढ देण्यात आली यामध्ये. 
कुशल - रु.400 /-प्रति वर्षी
अर्धकुशल- रु.300/-प्रति वर्षी
अकुशल - रु.200/- प्रति वर्षी  प्रमाणे वाढ करण्यात आली.

महागाई भत्ता : कामगारांना महागाई भत्ता सरकारी नियमाप्रमाणे देण्यात येणार आहे.

मेडीक्लेम विमा : सर्व कामगारांना व्यवस्थापणाकडून 50%  कुटुंब सहित 500000 लाख रुपयेचा मेडीक्लेम विमा देण्यात आला.

शैक्षणिक निधी : कामगाराच्या 10वी व 12वी पास विध्यार्थ्यांना प्रोत्साहन निधी. रु 1500/- ते 3500/- पर्यंत देण्यात येणार आहे.

कॅन्टीन सुविधा : कामगारांना स्वस्त दरात नाष्टा व जेवण देण्यात येणार आहे.

   नवीन करार यशस्वी करण्यासाठी पूना क्लबचे अध्यक्ष - श्री गौरव गढोक, उपाध्यक्ष - श्री इंद्रनील मुजगुले, स्टाफिंग चेअरमन - श्री मनजीत राजपाल सर्व कमिटी सभासद ,पूना क्लबचे सी .ई.ओ सेक्रेटरी लेफ्टनंट कर्नल - श्री अशोक सरकार (रिटायर्ड) ,पूना क्लब चे लीगल ऍडव्हायजर - श्री .आदित्य जोशी यांचे खूप मोठे योगदान आहे.

     या करारामध्ये पूना क्लब कामगार युनियन तर्फे युनियनचे अध्यक्ष - श्री सचिन धोंगडे, उपाध्यक्ष - श्री विलास पार्टे, सचिव - श्री सिद्धेश्वर ओव्हाळ ,खजिनदार - श्री प्रवीण देवघन, संचालक - श्री.दिपक कुचेकर, संचालक - श्री राहुल कांबळे, संचालक - श्री किरण शिंदे तसेच युनियनचे सल्लागार - श्री शिवाजीराव खटकाळे (भाऊ) व वकिल - श्री गौरव पोळ यांचा मोलाचा वाटा आहे. अशी माहिती पूना क्लब युनियनच्या वतीने देण्यात आली तसेच पूना क्लब व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले.