एनआयपीएम (NIPM) चा ४५ वा वर्धापन दिनानिमित्त NIPM पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टर क्रिकेट क्नॉक आऊट सिरीज २०२५ ला उस्फुर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड : दि. २२ मार्च २०२५ रोजी चोंधे पाटील क्रिकेट मैदानावर NIPM पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टर च्या वतीने  क्रिकेट क्नॉक आऊट सिरीज २०२५ चे आयोजन सायंकाळी ०५ ते १०.३० या वेळेदरम्यान करण्यात आले होते. १०० पेक्षा अधिक नामांकित कंपन्या मधील मनुष्यबळ विभागात काम करणाऱ्या अंदाजे १६९ पेक्षा जास्त प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून या स्पर्धेचा आनंद लुटला. 

स्पर्धेचे उदघाटन सुप्रसिद्ध वकील आर एम निर्मल यांनी केले, एच आरअधिकाऱ्यांनी आपले  शारीरिक व मानसिक आरोग्य जपणे महत्वाचे असून संस्थेच्या उत्पादकता वाढीसाठी व कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आपली भूमिका अतिशय महत्वाची ठरते, तसेच एच आर अधिकारी हा कर्मचारी व व्यवस्थापन यामधील महत्वाचा दुवा असल्याचे  मत त्यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मांडले.  

या स्पर्धेचा मूळ हेतू कोलेब्रेशन, शारीरिक व मानसिक आरोग्य खेळाच्या माध्यमातून जपण्याचा संदेश देणे हा होता. या स्पर्धेचे आयोजन  एन आय पी एम पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टर या संस्थेचे  चेअरमन नवनाथ सूर्यवंशी, सेक्रेटरी अभय खुरसाळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व अर्जुन माने यांच्या व्यवस्थापनाखाली करण्यात आले होते.  

या स्पर्धेमध्ये महिला एच आर प्रतिनिधींनी व एन आय पी एम च्या लाईफ  मेंबर व  त्यांच्या  परिवारातील सदस्यांनी मोठ्या प्रमाणात  सहभाग घेतला. या स्पर्धेदरम्यान एकूण दहा क्रिकेटचे सामने खेळविण्यात आले व विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या सहभागी स्पर्धकांना विविध पारितोषिक देऊन चॅप्टरच्या वतीने गौरविण्यात आले 

ही स्पर्धा  रेड कार्स, एम आय टी युनिव्हर्सिटी कोथरूड तसेच व्ही एम एस  मल्टीसर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या पुढाकाराने घेण्यात आली 

या स्पर्धेस  विशेष करून मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी सतीश करंजकर, सतीश पवार,विलास खरात, दत्तात्रय नखाते, उदय खरात, प्रीती पाटील,   युवराज पवार, अमित देशपांडे यांची उपस्थिती लाभली. या स्पर्धा दिवस रात्र अशा विद्युत रोषणाईत खेळविण्यात आल्या.

सर्व विजेत्या संघांना विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,समालोचन अर्जुन माने व गणेश  पाटील यांनी केले.

एच आर अधिकारी आप्पा मोरे यांचे स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य लाभले तसेच  एन आय पी एम राष्ट्रीय कमिटीचे विभागीय सदस्य अमोल कागवडे, चॅप्टरचे पदाधिकारी चेतन मुसळे, प्रदीप मानेकर, रमेश बागल, राहुल निंबाळकर तसेच मधुकर सूर्यवंशी या सर्वानी परिश्रम घेतले.

एनआयपीएम ही संस्था राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एच आर क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाठी अविरत कार्यरत आहे. एनआयपीएम पिंपरी, चिंचवड व चाकण या चॅप्टरच्या  माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम व औद्योगिक चालू घडामोडींवर होणारे बदल याविषयीच्या चर्चासत्राचे आयोजन विशेष तज्ञ मार्गदर्शकाना आमंत्रित करून केले जाते. या सर्व उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी व सर्वांगीण विकासाठी, पिंपरी, चिंचवड, तळेगाव, हिंजवडी, चाकण तसेच शिरवळ या औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एच आर क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  एनआयपीएम पिंपरी, चिंचवड व चाकण या चॅप्टरशी  जोडले जाण्याचे आवाहन ह्या चॅप्टरच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या माध्यमातून करण्यात  येत आहे.