नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) संघटनेने शुक्रवारी फॉर्म 13 मध्ये बदल केला. याबरोबरच ईपीएफ अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी एम्प्लॉयरच्या मंजुरीची अट काढून टाकण्यात आली आहे.
खासगी क्षेत्रात जेव्हा कर्मचारी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत रुजू होतो त्यावेळी कर्मचाऱ्याला ईपीएफ अकाउंट ट्रान्सफर करण्याची गरज पडते. आता ईपीएफओने घेतलेल्या या निर्णयामुळे कोट्यावधी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या कर्मचाऱ्यांना आता जॉब चेंज केल्यानंतर पीएफ अकाउंट ट्रान्सफर करण्यात अडचणी कमी होणार आहेत.
आतापर्यंतची कार्यवाही पाहिली तर पीएफ अकाउंट ट्रान्सफर सोर्स ऑफीस आणि डेस्टिनेश ऑफीस दोन्हींच्या भागीदारीने होत होते. आता नवीन नियमानुसार ईपीएफओ अकाउंट ट्रान्सफरमध्ये डेस्टिनेशन ऑफीसच्या ॲप्रू्व्हलची गरज राहणार नाही. फक्स सोर्स ऑफीसच्या ॲप्रूव्हलने काम होणार आहे. अकाउंट ट्रान्सफरची प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी ईपीएफओने फॉर्म 13 सॉफ्टवेअरला लाँच केले आहे.
1.25 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार
एकदा सोर्स ऑफीसकडून क्लेम मंजूर झाल्यानंतर अकाउंट आपोआप डेस्टिनेशन ऑफीसमध्ये ईपीएफओ सदस्याच्या सध्याच्या खात्यात ट्रान्सफर होईल. या निर्णयामुळे 1.25 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे दरवर्षी जवळपास 90 हजार कोटी रुपये ट्रान्सफर होऊ शकतील. अकाउंट ट्रान्सफर प्रक्रियेला वेग येईल अशी माहिती ईपीएफओने एका निवेदनात दिली आहे.