बुरखार्ट कॉम्प्रेशन इंडिया प्रा. लिमिटेड (Burckhardt Compression (India) Pvt. Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : कोंढापुरी, पुणे येथील बुरखार्ट कॉम्प्रेशन इंडिया प्रा. लिमिटेड (Burckhardt Compression (India) Pvt. Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि बुरखार्ट कॉम्प्रेशन कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात दिनांक: ०३ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाला.

वेतन कराराची ठळक वैशिष्टे : 

कराराचा कालावधी : तीन वर्ष असेल (दि.०१ जानेवारी २०२५ ते दि.३१ डिसेंबर २०२७)

एकूण पगार वाढ : अप्रत्यक्ष रु.१९,५००/-  तसेच प्रत्यक्ष रु.१७,६७९/- रू एवढा झाला आहे.
प्रथम वर्ष : रुपये ७८००/-(४०%)
दुसरे वर्ष: रुपये ५८५०/- (३०%)
तिसरे वर्ष: रुपये ५८५०/- (३०%)

फरक रक्कम : दि.१ जानेवारी २०२५ पासून ते दि.३१ मार्च २०२५ पर्यंत  एक रकमी देण्याचे मान्य करण्यात आले.

नाईट शिफ्ट अलाऊंस : प्रचलित नाईट शिफ्ट अलाउन्स मध्ये  प्रतिदिन  ५०/- रुपये वाढ करण्यात येऊन प्रतिदिन रुपये २००/- करण्यात आला

रजा : प्रचलित PL रजेच्या साठवणुकीमध्ये 10 ची वाढ करून ती 90 करण्यात आली.

GPA (ग्रुप पर्सनल एक्सीडेंट पॉलिसी) : प्रचलित ग्रुप पर्सनल एक्सीडेंट पॉलिसीमध्ये रुपये दहा लाखांची वाढ करून प्रति कामगार २५ लाखांवरून ३५ लाख रुपये  करण्यात आली

मेडिक्लेम पॉलिसी : प्रचलित मेडिकल पॉलिसी (०४लाख) मध्ये कॉर्पोरेट बफर पॉलिसी Add करण्यात आली.

मेडिकल चेक-अप : ज्या कामगारांची High BP मुळे stress test होत नाही, त्यांची 2D Echo test केली जाईल.

वाहतूक व्यवस्था : वाहतूक व्यवस्थेची पूर्ण जबाबदारी व्यवस्थापनाने घेऊन , यामध्ये शिवाजीनगर ते कंपनी तसेच शिरूर ते कंपनी अशा दोन रूटवर A/C BUS चालू करण्यात आल्या.

Short leave : प्रत्येक कामगारास वर्षातून तीनदा ०१ तासाची Short leave चालू करण्यात आली.

युनियन ऑफिस भाडे : प्रचलित युनियन ऑफिसच्या भाड्यामध्ये रुपये २०००/- ची वाढ करून रुपये १०,०००/-करण्यात आली.

तसेच मागील सर्व चालू सोई-सुविधा यापुढे अशाच चालू राहतील आणि भविष्यात लवकरच रिटायरमेंट बोनस मध्ये वाढ करण्याबाबत तसेच  पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्याबाबत व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दाखवला आहे.

     करार यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष श्री किशोरजी ढोकले, उपाध्यक्ष श्री राजूआण्णा दरेकर, श्री राजाराम शिंदे, श्री अविनाश वाडेकर तसेच श्री गणेश जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

     करारवेळी व्यवस्थापनाच्या वतीने मॅनेजिंग डायरेक्टर श्री श्रीकांत पाटील, माजी मॅनेजिंग डायरेक्टर श्री मिलिंद वागळे, जनरल मॅनेजर मॅन्युफॅक्चरिंग (फॅक्टरी हेड) श्री संजय खरात, जनरल मॅनेजर एचआर सौ प्राची सोनचल, असिस्टंट जनरल मॅनेजर एचआर श्री रवींद्र शेलार, मॅनेजर एचआर श्री अभिजीत पाटील तसेच ,  मॅनेजमेंट कमिटी तसेच कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री गजानन कोरडे, उपाध्यक्ष श्री सुहास दरेकर, ज.सेक्रेटरी श्री हेमंतकुमार देशमुख, खजिनदार श्री अमित गायकवाड, सह.जन.सेक्रेटरी श्री. मोहन काळोखे, सदस्य श्री अमोल झुंजुरके, सदस्य श्री रोहिदास घारमळकर यांनी काम पहिले अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.