ZF India Pvt Ltd येथे वेतनवाढ करार संपन्न

चाकण : चाकण औद्योगिक वसाहाती मधील वासुली येथील ZF India Pvt. Ltd कंपनी व्यवस्थापन आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या तिसरा वेतनवाढ करारावरती संघटनेचे प्रमुख सल्लागार  आमदार पै. महेशदादा लांडगे,  पै. रोहिदास गाडे व अध्यक्ष जीवन येळवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक ०२/०३/२०२५ रोजी संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ट्ये : 

०१) कराराचा कालावधी : ०१/०४/२०२४ ते ३१/०३/२०२७ या तीन वर्षांचा राहील.

०२) एकूण पगारवाढ : रु.२०,१००/- (वीस हजार शंभर रुपये )
पगाराचा रेशो :- पहिल्या वर्षी ८०% दुसऱ्या वर्षी १०% तिसऱ्या वर्षी १०% मिळणार.
प्रत्येक कामगाराला प्रत्येकी ११ महिन्याचा फरक देण्यात येणार आहे.

०३) मेडिक्लेम पॉलीसी  : २,००,०००/- रुपये संपूर्ण खर्च कंपनी करणार, व जादाची १०,००,०००/- रुपयांची बफर पॉलीसी, या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, मुले आणि आई वडील यांचा समावेश करण्यात आला आहे.

०४) मृत्यू साहाय्य योजना :
अ) मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसांचा पगार व २४ लाख रुपये  कंपनीकडून कायदेशीर वारसास मिळणार.
ब) एखाद्या कामगाराचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास युनियन सोबत चर्चा करून त्यास मदतनिधी व योग्य त्या ठिकाणी कामावर ठेवण्यात येईल.

०५) ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी : रु.४० लाख रक्कम कंपनीकडून वारसदारास देण्यात येईल.

०६) जर एखाद्या कामगाराचा कंपनीत कामावर असताना अपघात झाल्यास त्यामुळे त्याचे काही काळा नंतर उद्धवणार्‍या आजाराचा खर्च पूर्णपणे कंपनी करणार

०७) सूटया :
A) PL - २१,
B) SL - ०८
C) CL - ०७ 
D) PH - ११
E) मतदानाची सुट्टी :  सरकारी आदेशानुसार राहील,
F) दुखवटा सुट्टी कामगारच्या घरातील, नात्यामधील (ब्लड रिलेशन) मधील कोणी मयत झाल्यास पगारी सुट्टी ६ दिवस.
G) पितृत्व राजा : पुरुष कामगाराला पितृत्व रजा म्हणून पगारी सुट्टी तीन दिवस

०८) दिवाळी बोनस : कायदेशीर बोनसच्या व्यतिरिक्त अधिकचा CTC च्या बाहेर ८५०१/- रुपये रक्कम बोनस म्हणून देण्यात येईल, व २०००/- रुपये रकमेची एक भेट वस्तू देण्यात येईल.

०९) मासिक हजेरी बक्षीस : ज्या कामगाराचे प्रत्यक्ष कामाचे पूर्ण दिवस भरतील त्या कामगारास मासिक हजेरी बक्षीस म्हणून १०००/- (एक हजार) रुपये देण्याचे मान्य व त्यामध्ये दोन शॉर्ट लिव्ह ग्राह्य धरण्यात येतील कंपनीमध्ये अपघात झाल्यास तो कामगार या योजनेस पात्र राहील.

१०) सेवा बक्षीस : 
A) प्रत्येक कामगारस कंपनी पॉलिसी प्रमाणे सेवा बक्षीस दिले जाईल 

११) वैयक्तिक कर्ज सुविधा : प्रत्येक कामगारास १०००००/- (एक लाख) रुपये देण्याचे मान्य, तसेच यापेक्ष्या जास्त रक्कम हवी असल्यास एकत्रित चर्चा करून मदत करण्यात येईल 

१२ ) कँटीन व बस सुविधा : a) मंगळवारी नाष्टयासाठी दोन अंडी आणि एक शेंगदाणा लाडू दिला जाईल.

१३ ) ड्रेस : 
a) उच्च प्रतीचे टी शर्ट - ०२ आणि ०१ शर्ट 
b) पॅन्ट - २, 
c) शूज - १२००/- रुपये किंमतीचे,
d) जर्किंग - पहिल्या वर्षी १०००/- , दुसऱ्या वर्षी १२००/-, तिसऱ्या वर्षी १४००/- रुपये रक्कमेचे राहतील,

१४) बक्षीस योजना : कामगारांच्या मुला-मुलींसाठी इयत्ता पहिली ते दहावी मध्ये 80 टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या मुलांना मुलींना बक्षीस म्हणून कमीत कमी सातसे रुपये देण्याचे मान्य,

१५) गुणवंत कामगार पुरस्कार : प्रत्येक वर्षी दोन गुणवंत कामगारांची निवड करून त्यांना ८५०१/- रुपये एवढी रक्कम बक्षिस म्हणून देण्याचे मान्य,

१६) पाळी भत्ता : तिसरे पाळीसाठी शंभर रुपये पाळी भत्ता देण्याचे मान्य तसेच नाश्त्यासाठी पहिल्या ब्रेकमध्ये दूध आणि केळी, दुसऱ्या ब्रेकमध्ये दूध आणि बेकरी ॲटम तसेच शेवटी रेगुलर नाष्टा देण्याचे मान्य

         करारावरती  संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै. श्री. महेशदादा लांडगे, प्रमुख सल्लागार पै. श्री रोहिदास गाडे , संघटनेचे अध्यक्ष श्री.जीवन येळवंडे , सरचिटणीस श्री. कृष्णा रोहोकले, खजिनदार श्री. अमृत चौधरी, श्री. महादेव येळवंडे, प्रशांतआप्पा पाडेकर,  रविंद्र भालेराव, दत्तात्रय गवारे, यूनिट अध्यक्ष श्री तुषार पवळे,  उपाध्यक्ष श्री.विक्रम सुक्रे, सरचिटणीस श्री. राहुल भोसले, सहचिटणीस श्री अंगद चौधर, खजिनदार श्री आतिब शेख,संघटक श्री.प्रतीक कदम, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे प्लांट हेड. श्री.शामबाबू आकुला  साहेब, एच आर मॅनेजर श्री. रवी हंगारगे साहेब, यांनी सह्या केल्या.

      संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार  पै. श्री. महेशदादा लांडगे, अध्यक्ष श्री. जीवन येळवंडे  यांनी उपस्थित कामगार बंधू व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले, प्रास्ताविक एच. आर हेड रवी हंगारगे यांनी केले, तसेच सूत्रसंचालन पुजाताई थिगळे यांनी केले, व सरचिटणीस श्री. कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कामगारानी पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करून आनंद व्यक्त केला.