पुणे : रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी देहूगाव येथे शिंडलर इंडिया एम्प्लॉईज युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.प्रत्येक वर्षी कंपनीमध्ये कायम कामगारांमध्ये वाढ होत असल्यामुळे शिंडलर इंडिया एम्प्लॉईज युनियनची एकूण सभासद संख्या 138 झालेली आहे. शिंडलर इंडिया एम्प्लॉईज युनियन तर्फे त्यांचे या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये स्वागत करण्यात आले.
या वार्षिक सभेमध्ये श्रमिक एकता महासंघ कडून श्रमिक एकता महासंघाचे प्रमुख सल्लागार श्री मारुतीराव जगदाळे, जनरल सेक्रेटरी श्री रोहित पवार व हुंडाई एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष श्री सायबण्णा गोविंदे उपस्थित होते.
यांनी सभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व कामगारांना मॉडेल स्टॅंडिंग ऑर्डर, नवीन कामगार कायद्याबाबत माहिती, डिसिप्लिन, टेक्नॉलॉजी मधील बदल, रोबोटिक तंत्रज्ञान, कंपनीमधील कामाबाबत ओनरशिप , कामगारांचे युनियन सभासद म्हणून असलेले कर्तव्य व मजबूत एकी या सर्व विषयांबाबत मार्गदर्शन केले.