पिंपरी चिंचवड : NIPM पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टर च्या वतीने NIPM च्या ४५ व्या वर्धापन दिनाचे आयोजन दिनांक १५ मार्च २०२५ रोजी हॉटेल किरियाड आकुर्डी येथे सायंकाळी ०६ वाजता आयोजन केले आले आहे.
या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड झोन ३ चे डीसीपी डॉ शिवाजी पवार, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन उप संचालक स्वप्नील देशमुख, खेड पुणे विभागीय डी वाय एस पी अमोल मांडवे तसेच बीटीआरआय चे अप्रेन्टिस सल्लागार सुनील खुडे या सर्व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या महिला दिनाचे औचित्य साधून NIPM पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टरच्या लाईफ मेंबर असलेल्या महिलांचा चॅप्टरच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या पत्रकारिता, शैक्षणिक तसेच कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांना यादरम्यान सन्मानित करण्यात येणार आहे.
वर्धापन दिनानिमित्त एच आर क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी ५० टक्के सवलतीच्या दरात लाईफ मेंबर होण्याची संधी ३१ मार्च २०२५ पर्यन्त उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या संबधितांनी चॅप्टर चेअरमन नवनाथ सूर्यवंशी (9881056538), सेक्रेटरी अभय खुरसाळे (9595885000), खजिनदार प्रदीप मानेकर (9890233915), EC मेंबर अर्जुन माने (9975945533), रमेश बागल (9881049156), राहुल निंबाळकर (9371806297) तसेच मधुकर सूर्यवंशी (8237008687) यांच्याशी संपर्क साधावा.
दिनांक २२ मार्च २०२५ रोजी चोंधे पाटील क्रिकेट मैदानावर NIPM पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टर क्रिकेट क्नॉक आऊट सिरीज २०२५ चे आयोजन सायंकाळी ०६ ते ०९ या वेळेदरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या टीमच्या सदस्यांनी अर्जुन माने (9975945533) यांच्याशी संपर्क साधावा.
वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमासाठी NIPM पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टरच्या सर्व लाईफ मेम्बर्सना आमंत्रित करण्यात आले आहे.