पिंपरी (प्रतिनिधी) : न्याय संस्था आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यातील समन्वय साधण्यासाठी मनुष्यबळ संसाधन विकास विभागाची महत्वपूर्ण भूमिका ठरते. कंपनीमध्ये मनुष्यबळ विकास विभागाचे योगदान मोलाचे ठरते .उद्योजकांना कुणीही त्रास देत असेल तर त्याची गय करु नका. असा जो आदेश मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे याचे पालन आम्ही करत आहोत, आयुक्त विनयकुमार चौबे देखील उद्योग क्षेत्रातील समस्यांना अधिक प्राधन्य देतात. पण तुमच्या समस्या आमच्यापर्यंत येत नाही,समस्या कोणत्याही असोत त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करु, असे आश्वासन परिमंडळ तीनचे पो. उपायुक्त डॉ.शिवाजी पवार यांनी याप्रसंगी दिले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट ( एनआय पीएम) पिंपरी-चिंचवड-चाकण चॅप्टरच्या वतीने आकुर्डीत १५ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या ४५ वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे उप संचालक स्वप्निल देशमुख, खेड विभागीय पो. उप अधीक्षक अमोल मांडवे, प्रशिक्षण सल्लागार सुनील खुडे, चॅप्टरचे चेअरमन नवनाथ सूर्यवंशी, सचिव अभय खुरसाळे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मीडियाची सेवा देणारे जेष्ठ पत्रकार शिवाजी घोडे,सेंट अँड्रुजचे मुख्याध्यापक राजेश बनसोडे, 'कामगार नामा'चे संस्थापक संपादक भूषण कडेकर यांना विशेष कार्य गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले.तसेच महिला दिनानिमित्त औद्योगिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या एच आर क्षेत्रातील ३८ महिलांचा व क्रीडा क्षेत्रात सुवर्ण पदक पटकवल्याबद्दल निर्भई गिरासे हिचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी उपसंचालक देशमुख म्हणाले कि,उद्योगाकडे शासन सकारात्मक दृष्टीने पाहत आहे. राज्याच्या विकासामध्ये उद्योग क्षेत्र आणि कामगारांचे मोठे योगदान आहे. कंपनीसाठी मनुष्यबळ विकास अधिकारी हे ब्रहदेवा समान असतात . नवीन कामगारांचे जॉइनिंग पासूनच त्याचे भविष्य लिहिण्याचे काम एच आर अधिकारी करत असतात. खाजगी आणि शासकीय क्षेत्राने एकत्रित काम केल्यास विकास घडून येईल. औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडवल्यास पुणे हे उद्योगाचे माहेरघर होईल.
पो. उप अधीक्षक मांडवे म्हणाले कि,भविष्यात एच आर विभाग आणि पोलीस खाते यांच्यात कोलॅब्रेशन करून पार्टनरशिप करणे गरजेचे आहे.
खुडे म्हणाले कि, आपल्याला केवळ कामगार तयार नाही तर कुशल कामगार तयार करायचे आहे. औद्योगिक आणि कामगार यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमास एच आर क्षेत्रातील प्रमुख राहुल बागले,उदयसिंग खरात,राधा गोखले,प्रीती वर्मा,महेंद्र फणसे,सतीश करंजकर,शीतल साळुंके, युवराज पवार, प्रीती पाटील, दत्तात्रय नखाते यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चॅप्टरचे चेअरमन नवनाथ सूर्यवंशी यांनी चॅप्टरच्या निर्मितीपासून तर आत्तापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला व त्यासाठी पूर्वीचे सर्व चेअरमन, सेक्रेटरी तसेच संपूर्ण कमिटी व आत्ताची सर्व कमिटीचे तसेच सर्व सन्मानीय सदस्यांचे आभार व्यक्त केले. या चॅप्टरच्या सदस्यांच्या व एच आर क्षेत्राच्या प्रगतीसाठी हे चॅप्टर कटीबद्द आहे. इतर चॅप्टरशी आपली तुलना होऊ शकत नाही कारण आपला उद्देश उत्तम गुणवत्ता देणे हा असून हे चॅप्टर तुम्हा सर्वांचे आहे व ते अतिशय सुरक्षित टीमच्या हातात असल्याची खात्री बाळगण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
४५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एच आर क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी ५० टक्के सवलतीच्या दरात लाईफ मेंबर होण्याची संधी ३१ मार्च २०२५ पर्यन्त उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या संबधितांनी नवनाथ सूर्यवंशी (9881056538),अभय खुरसाळे (9595885000), प्रदीप मानेकर (9890233915), अर्जुन माने (9975945533), रमेश बागल (9881049156), राहुल निंबाळकर (9371806297) तसेच मधुकर सूर्यवंशी(8237008687) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन चॅप्टरचे सेक्रेटरी अभय खुरसाळे यांनी याप्रसंगी केले.
दि. २२ मार्च २०२५ रोजी चोंधे पाटील क्रिकेट मैदानावर NIPM पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टर क्रिकेट क्नॉक आऊट सिरीज २०२५ चे आयोजन सायंकाळी ०६ ते ०९ या वेळेदरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या टीमच्या सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अर्जुन माने (9975945533) यांनी या प्रसंगी केले.
वर्धापन दिनाच्या आयोजनासाठी एन आय पी एम राष्ट्रीय कमिटीचे विभागीय सदस्य अमोल कागवडे, नरेंद्र पाटील, चॅप्टरचे माजी चेअरमन तुषार टोंगळे, सतीश पवार,चेतन मुसळे अर्जुन माने, प्रदीप मानेकर, रमेश बागल, राहुल निंबाळकर तसेच मधुकर सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप्रज्वलन व राष्ट्रगीताने झाली, २२० सदस्यांसह इतर मान्यवरही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप मानेकर व राहुल निंबाळकर यांनी तर आभार सावित्री गोसलवाड यांनी मानले.