छत्रपती संभाजीनगर : येथे दिनांक 9 मार्च 2025 रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या शासनाच्या सेवेत असलेल्या राष्ट्रीय श्रमिक आघाडी च्या सभासद असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचारी प्रतिनिधींचा मेळावा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भाऊ भोसले याच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपस्थित विविध जिल्ह्यातून आलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचारी यांनी आपल्या व्यथा, प्रश्न, अडी अडचणी मांडल्या.
या कर्मचारी प्रतिनिधिनी अनेक प्रश्न व अडचणी आमच्यासमोर मांडल्या, महाराष्ट्र शासनाने आपले प्रश्न मार्गी लाववेत या करिता आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू तिथे न्याय न मिळाल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठाऊ परंतु आपणास न्याय मिळवून देऊ असे आश्वासन या वेळी यशवंतभाऊ भोसले यांनी उपस्थित कामगारांना दिले व एक दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
त्या नंतर छत्रपती संभाजी नगर महानगपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा भव्य मेळावा पार पडला. यावेळी कामगार नामाचे श्री. भूषण कडेकर यांनी सर्व कामगारांना एकजूट राहा यश नक्कीच तुम्हाला मिळेल असे आश्वासित केले. श्री संदीपान काची, श्री.अनिरुद्ध कुलकर्णी, राजेश ढाले यांनी मेळाव्याचे संयोजन केले.