सनविजय कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात कामगारांचे आंदोलन

चंद्रपूर : ताडाळी एमआयडीसी मधील सनविजय कंपनीचा मनमानी कारभार सुरु असून एका कामगाराचा अपघात झाल्यानंतर सुद्धा त्याला कुठलीही वैद्यकीय सुविधा न देता व त्याला पगार न देता कामावरून कमी केल्या प्रकरणी जवळपास १० कामगारांनी कपंनी विरोधात आवाज उठवला होता, मात्र कंपनीने त्या १० कामगारांनाचे कामावरून कमी केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्या नेतृत्वात एक दिवशीय ठिय्या आंदोलन केले, तरीही कंपनी प्रशासन कामगारांना कामावर घेण्यास तयार नसल्याने आता कामगारांनी कामबंद आंदोलन ७ फेब्रुवारी पासून सुरु झाले आहे, दरम्यान कंपनी व्यवस्थापन यांच्या सोबत मनसे पदाधिकारी यांची झालेली बैठक ही निष्फळ ठरली असल्याने हे आंदोलन सुरुचे राहणार असल्याची माहिती आहे असे वृत्त विदर्भ न्यूज एक्सप्रेस वृत्तसंस्थेने दिले आहे.

     सनविजय अलॉय पॉवर कंपनीत जे कंत्राटदार आहेत त्यापैकी अनेकांची नोंदणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नसून त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगारांची संख्या जवळपास २०० च्या वर आहे, दरम्यान अशाच एका बेकायदेशीर कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदार यांच्या एका कामगारांचा अपघात झाला होता तरी सुद्धा त्याला कंत्राटदार किंव्हा कंपनी कडून वैद्यकीय खर्च दिला नाही तर उलट त्याला कामावरून काढून टाकल्या गेले, याकरिता जवळपास २२ कामगारांनी आवाज उठवला की त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे मात्र कंपनी ठेकेदारांनी उलट त्यापैकी १० कामगारांना कामावरून काढून टाकले यावरून कंपनीच्या कंत्राटदारांकडून मनमानी कारभार असून कामगारावर अन्याय होते आहे, त्यामुळे मनसे कामगार सेनेच्या पाठिंब्याने आंदोलन सुरूच आहे.

    या कंपनीत जवळपास ३५० ते ४०० कामगार काम करीत आहे मात्र त्यापैकी अनेक बोगस कंत्राटदार आहेत त्यांच्या कडे ते काम करतात व कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा होते नाही आणि किमान वेतन कायाद्यानुसार त्यांना वेतन मिळते नाही, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातून दरवर्षी कामगारांच्या वेतन धोरनानुसार किमान वेतन संबंधी आदेश निघतो मात्र यां कंपनीतील कामगारांना दरवर्षी वेतन वाढ होते नाही, त्यांना वैद्यकीय सुविधा नाही, कंपनीत ऍम्ब्युलन्स आहे पण त्यात पेट्रोल डिझेल नाही, कामगारांना काही दुखापत झाली तर शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ताडाळी येथे उपचार केल्या जातो, त्यामुळे ही कंपनी पूर्णतः बेकायदेशीर असून यां विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या झेंड्याखाली माध्यमातून ७ फेब्रुवारी पासून आंदोलन सुरु आहे, मात्र ते आंदोलन होऊ नये यासाठी कामगारावर दबाव आणल्या जात आहे पण कामगारांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून जोपर्यंत कामगारांच्या मागण्या मान्य होते नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिले असा इशारा मनसे कामगार जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांनी कपंनी प्रशासनाला दिला आहे.

    यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहत्तुक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळबाधे सुनील गुढे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, अँड. अजीतकुमार पांडे मोहम्मद फयाज इत्यादीची उपस्थिती होती.