कामगार कल्याण मंडळाच्या नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी सुरू

पुणे : हाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पुणे विभागातर्फे आयोजित ७०व्या नाट्य महोत्सव स्पर्धेच्या अंतिम फेरीला सोमवारपासून (ता. १०) सुरुवात झाली. ही स्पर्धा सदाशिव पेठेतील भरतनाट्य मंदिरात ७ मार्चपर्यंत रंगणार आहे असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.

    अंतिम फेरीचे उद्‍घाटन आमदार हेमंत रासने, राज्याचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन झाले. ''कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. गेल्या ७० वर्षांपासून अविरतपणे ही स्पर्धा सुरू आहे,'' असे इळवे यांनी स्पष्ट केले. या स्पर्धेचे परीक्षण प्रभाकर दुपारे, गणेश दिघे, मीनाक्षी केंढे, वर्षा वाघमारे आणि अजय धवने हे करणार आहेत. परीक्षकांचे स्वागत पुणे विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी केले.