चाकण : येथील एमआयडीसी मधील लुमँक्स काँर्नालिया ऑटो टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (Lumax Cornaglia Auto Technologies Private Limited) कंपनी व्यवस्थापन व शिवक्रांती कामगार संघटना यांच्यात दोन वर्षांपासून चालू असलेल्या चर्चेनंतर अनेक अडथळे पार करीत व्यवस्थापन व संघटना यांच्यामध्ये दि.12 फेब्रुवारी 2025 रोजी पगार वाढीचा वेतन करार संपन्न झाला.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :
करार कालावधी : सदर करार हा दि.1 जानेवारी 2023 ते दि.31 डिसेंबर 2025 या तीन वर्षाकरिता झालेला आहे.
पहिले वर्ष : रु.8750/-
दुसरे वर्ष : रु.2550/-
तिसरे वर्ष रु.1700/-
फरक रक्कम : दिनांक 1 जानेवारी 2023 पासूनची फरकाची रक्कम कामगारांना देण्याचे मान्य करण्यात आले आहे. फरका पोटी दोन ते अडीच लाख रुपये प्रत्येक कामगाराला मिळणार आहेत.
बोनस : सदर करारातील तरतुदीनुसार कामगारांना बोनस देण्याचे मान्य झाले आहे.
सध्या मिळत असलेल्या सोई सुविधा यापुढेही मिळणार आहेत.
सदर वेतन वाढ करारावर व्यवस्थापनाच्या वतीने श्री. राजेश दुबेवार (एस बी यु हेड), श्री. एस. के दिवेदी (असिस्टंट व्हॉईस प्रेसिडेंट एचआर एडमिन), श्री शंकर साळुंखे (एच आर आय आर), श्री कौस्तुभ साका (ऑपरेशन हेड), श्री अनिल जाधव (एचआरहेड), श्री सुभाष चौधरी (प्रोडक्शन हेड), श्री सचिन यादव (असिस्टंट एच आर.) तसेच संघटनेच्या वतीने शिवक्रांती संघटना श्री. विजय पाळेकर सरचिटणीस, श्री गुलाबराव मराठे वरिष्ठ चिटणीस, श्री रवींद्र साठे खजिनदार, श्री प्रमोद जाधव युनिट अध्यक्ष श्री. वैभव फडके, युनिट उपाध्यक्ष श्री सचिन कानूरकर तसेच इतर कामगार यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
दरम्यानच्या काळात अनेक अडथळ्यांचा सामना संघटना व कामगारांना करावा लागला. परंतु कामगारांची एकजूट व संघटनेवर असलेला विश्वास व संयम यामुळेच हे साध्य होऊ शकले आहे. तसेच करार यशस्वी होण्यामध्ये श्री राजेश दुबेवार व एस के दिवेदी आणि शिवक्रांती संघटना सरचिटणीस ऍडव्होकेट श्री. विजय पाळेकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान व मार्गदर्शन मिळाले आहे. सदरचा करार संपन्न होण्याकरिता व्यवस्थापनाचे अधिकारी व कामगारांनी सहकार्य केल्याबद्दल संघटनेच्या वतीने धन्यवाद मानण्यात आले.