फेसेनिअस काबी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Fresenius Kabi India Private Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

रांजणगाव एमआयडीसी : दोन वर्षांपासुन चालू असलेल्या चर्चेनंतर कामगार आणि मॅनेजमेंट यांच्यामध्ये समेट घडून आला व अनेक अडथळे पार करीत फेसेनिअस काबी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Fresenius Kabi India Private Limited) कंपनी व्यवस्थापन आणि व कामगार संघटना यांच्यामध्ये वेतन करार संपन्न झाला.

वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :

करार कालावधी : सदर करार दिनांक 01 जानेवारी 2023 ते  31  डिसेंबर  2025  तीन या वर्षांकरिता झालेला आहे.

पगारवाढ :  सदर करारापोटी कामगारांना सरसकट तीन वर्षांकरिता रुपये 15088/- (पंधरा हजार अठ्यांशी) इतकी ( CTC) (12250/-(in hand) ) देण्यात आली आहे.
पहिले वर्ष  :- 4900/-रुपये,
दुसरे वर्ष   :- 4900/-रुपये, 
तिसरे वर्ष  :- 2450/-रुपये.
दिनांक 01 जानेवारी 2023 पासून ची फरकाची रक्कम  कामगारांना मिळणार आहे.

बोनस : सदर करारातील तरतुदीनुसार कामगारांन 20 टक्के बोनस मिळणार आहे  सध्या मिळत असलेल्या सुविधा यापुढेही  मिळणार आहे.

मेडिक्लेम पॉलिसी : अडीच लाख रुपये करण्यात आलेली आहे.  

ग्रुप पर्सनल एक्सीडेंट पॉलिसी : Gross सॅलरीच्या 20 पट कमीत कमी 05 लाख आणि जास्तीत जास्त 20 लाखापर्यंत देण्याचे मान्य केले आहे. 

मृत्यू सहायता निधी : कामगारांचा एक दिवसाचा पगार व तेवढीच  रक्कम व्यवस्थापन देण्याचे मान्य केले आहे एखादा कामगारांचा मृत्यू नॅचरल किंवा एक्सीडेंट झाला तर त्याच्या कुटुंबीयास बेसिकच्या सॅलरीच्या तीस पट कमीत कमी 15 लाख व जास्तीत जास्त 40 लाखापर्यंत ची मदत देण्याचे मान्य केले आहे.  

दिवाळी गिफ्ट आणि स्वीट मध्ये वाढ करण्यात आलेली आहे .

     सदर वेतनवाढ करारावर व्यवस्थापनाच्या वतीने डायरेक्टर श्री. प्रकाश पाटील, एच आर श्री.दत्तात्रय नलमवार तसेच संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर लंघे, जनरल सेक्रेटरी श्री.पंडित वायदंडे, उपाध्यक्ष श्री.संतोष नवले, सह सेक्रेटरी श्री.विकास अभंग, खजिनदार श्री.नवनाथ शेवाळे‌ व कार्यकारणी सदस्य शिवाजी खरमाळे व नवनाथ काळे  यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

      दरम्यानच्या काळात अनेक अडथळ्यांचा सामना संघटना व कामगारांना करावा लागला. परंतु कामगारांची एकजूट व त्यांचा संघटनेवर असलेला विश्वास व संयम यामुळेच हे साध्य होऊ शकले आहे. तसेच करार यशस्वी होण्यामध्ये श्री.अरविंद स्त्रोती यांचे महत्त्वपूर्ण योगदान व मार्गदर्शन मिळाले आहे. श्रमिक एकता महासंघाचे  संघटनेचे सल्लागार श्री.मारुती जगदाळे यांचे यामध्ये खूप मोठे योगदान आहे. तसेच श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष श्री.किशोर सोमवंशी, जनरल सेक्रेटरी श्री.रोहित पवार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. सदरचा करार संपन्न होण्याकरिता व्यवस्थापनाचे अधिकारी व कामगारांनी सहकार्य केल्याबद्दल संघटनेच्या वतीने धन्यवाद मानण्यात आले.