विश्वकल्याण कामगार संघटना पदाधिकारी यांना संरक्षित कामगार (Protected Employee) म्हणून मान्यता

पुणे : चाकण येथील विश्वकल्याण कामगार संघटना पदाधिकारी यांना सहायक कामगार आयुक्त प्र. ब. जाधव यांनी संरक्षित कामगार (Protected Employee) म्हणून मान्यतेचा आदेश दिला.

     विश्वकल्याण कामगार संघटनेने बजाज ऑटो लिमिटेड चाकण व्यवस्थापनास संरक्षित कामगार (Protected Employee) म्हणून मान्यता देण्यासाठी पत्र दिले होते. परंतु व्यवस्थापनाने याची दखल न घेतल्याने सदर प्रकरण कामगार उपायुक्त कार्यालय याठिकाणी समेट कार्यवाहीत दाखल करण्यात आले. सदर प्रकरणी कामगार कार्यालय येथे बैठकी घेण्यात आल्या. त्यानंतर दि.०५ फेब्रुवारी २०२५ रोजी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी सदर कामगारांना संरक्षित कामगार (Protected Employee) म्हणून मान्यतेचा आदेश दिला.

    विश्वकल्याण कामगार संघटनेचे उपाध्यक्ष श्री नवनाथ कडू, सचिव श्री राजेंद्र महाडिक, कमिटी सदस्य श्री पांडुरंग पाटील, श्री विष्णू नाणेकर, श्री अंकुश कोल्हापुरे, श्री उदय जाधव, श्री राजेंद्र पाटील यांना सरंक्षित कामगार (Protected Employee) म्हणून मान्यता देण्यात आली. 

    याकरिता विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री दिलीप पवार साहेब, श्रमिक एकता महासंघाचे मुख्य सल्लागार मारुती जगदाळे साहेब तसेच महासंघाचे इतर पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.

     सदर आदेश जाहीर केले बाबत सहायक कामगार आयुक्त तथा समेट अधिकारी प्र. ब. जाधव यांचे विश्वकल्याण कामगार संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले.