हुंडाई (Hyundai Construction Equipment India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : हुंडाई (Hyundai Construction Equipment India Pvt Ltd) येथील मागील करार दिनांक 30 जून 2024 रोजी संपुष्टात आला व दिनांक 1 जुलै 2024 पासून नवीन करार करण्याबाबत हुंडाई व्यवस्थापना सोबत वाटाघाटी बाबत अर्थपूर्ण चर्चा चालू झाल्या.

       या वाटाघाटी चर्चेमध्ये हुंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनीची व्यावसायिक स्थिती, तसेच आपल्या कंपनीच्या प्रॉडक्ट ला बाजारपेठे मधील हुंडाईचे स्थान अधिक मजबूत कसे करता येईल या दृष्टीने व्यवस्थापन व युनियन प्रतिनिधी यांच्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा करार अंतिम स्वरूपात करण्यात यश प्राप्त झाले.यातून निश्चितच कामगारांची खूप भरभराट होईल.

        शुक्रवारी 17 जानेवारी 2025 रोजी MOU करण्यात आला, रविवार दिनांक 19/01/2025 रोजी याबाबत सर्वसाधारण सभा घेऊन तो कामगारांना पूर्ण समजावून त्या सभेमध्ये त्यांची मंजुरी घेण्यात आली . सभेमध्ये सर्व कामगारांनी टाळ्यांचा मोठा जल्लोष करत हा करार एकमताने मान्य केला.

वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :-

करार कालावधी :- दि. 1 जुलै 2024 पासून दि. 30 जून 2028

एकूण पगारवाढ :- 28,000 रुपये (4 वर्षाकरिता)
पहिल्या वर्षाकरिता :- 10,500 रुपये
दुसऱ्या वर्षाकरिता :- 6,000 रुपये
तिसऱ्या वर्षाकरिता :- 6,000 रुपये
चौथ्या वर्षाकरिता   :- 5,500 रुपये
फरकाची संपूर्ण रक्कम दिनांक 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत देण्यात येईल

मंथली इन्सेंटिव्ह :- किमान 4,500 रुपये ते 17,000 रुपये पर्यंतची तरतूद

वार्षिक इन्सेंटिव्ह :-  किमान 29,000 रुपये ते 52,500 रुपये पर्यंतची तरतूद करारामध्ये करण्यात आली आहे.

सर्विस अवॉर्ड :-
10 वर्ष सेवेसाठी :- 5,000 रुपये 
15 वर्षे सेवेसाठी :- 10,000 रुपये 
20 वर्षे सेवेसाठी :- 15,000 रुपये 
25 वर्षे सेवेसाठी :-  20,000 रुपये

रजा साठवणूक मर्यादा :- 175 दिवसापर्यंत साठवण्याची तरतूद करण्यात आली

रजेमध्ये वाढ :- 1 EL (अर्ण लिव्ह) वाढवण्यात आली

युनियन ऑफिस :- युनियन ऑफिस देण्याची तरतूद व्यवस्थापनाने मान्य केले त्यामध्ये पूर्ण रिक्वायर्ड सेटअप सहित युनियन ऑफिस देण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली

     करार करण्याकरिता व्यवस्थापनाकडून Mr. Byoung Hak Choi - (General Manager Operations & Factory Manager), श्री मनीष फणसळकर (HR Head & Admin.), श्री प्रकाश धोंडगे (AGM - ER) श्री संग्राम कदमबांडे(Dy. Maneger - HR) व हुंडाई एम्प्लॉईज युनियन कडून श्री सायबण्णा गोविंदे - अध्यक्ष, श्री रोहित पवार - जनरल सेक्रेटरी, श्री अश्विन गोरे - खजिनदार, श्री विजय गायकवाड - उपाध्यक्ष, श्री गणेश मिसाळ - उपाध्यक्ष, श्री राम केमसे - जॉइंट सेक्रेटरी, श्री सुरेश वराडे - जॉइंट सेक्रेटरी हे सर्व प्रतिनिधी यांनी करार यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान केले.

       हा करार संपूर्ण यशस्वी आणि अर्थपूर्ण करण्यासाठी श्रमिक एकता महासंघाचे प्रमुख सल्लागार श्री मारुतीराव जगदाळे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले तसेच तोडगा काढण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या लॉजिकल रणनीती आणि व्यवस्थापनासोबत तेवढीच सामंजस्याने केलेली चर्चा या सर्व गोष्टींचा समतोल ठेवण्यात आला.

      तसेच हुंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनीचे सल्लागार श्री रामचंद्र निर्मल यांनी या करारामध्ये युनियन आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये केलेली तांत्रिक मदत त्याबद्दलही त्यांचे विशेष आभार.

      हुंडाई एम्प्लॉईज युनियनच्या सर्व सभासद कामगारांनी जो युनियनला भक्कम असा पाठिंबा दिला आणि त्या सर्वांच्या एकीने हा करार यशस्वी करण्यात आला त्यामुळे सर्व सभासद कामगारांचे मनःपूर्वक आभार युनियनच्या वतीने मानण्यात आले.