पुणे : तळेगाव औद्योगिक नगरीतील ओग्निबेने इंडिया प्रा.लिमि (Ognibene India Pvt Ltd) कंपनी व्यव्यस्थापन आणि ओग्निबेने कामगार संघटना यांच्यामध्ये पाचवा वेतनवाढीचा करार, शांततामय ,उत्साहवर्धक आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मंगळवार दि. 24 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाला.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :
कराराचा कालावधी : दि 01/09/2024 ते 31/08/2027 (तीन वर्ष)
प्रथम वर्ष : 75% (रु.12750/-)
द्वितीय वर्ष : 15% (रु.2550/-)
तृतीय वर्ष : 10% (रु.1700/-)
सप्टेंबर 2024 ते डिसेंबर 2024 या चार महिन्याचा फरक एकरकमी देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
सन 2024 :- रुपये 55000/-
सन 2025 :- रुपये 55000/-
सन 2026 :- रुपये 55000/-
रात्रपाळी भत्ता : रुपये 60/- प्रति दिवस देण्याचे मान्य करण्यात आला आहे.
दिवाळी भेट वस्तु : रुपये 3000/- इतके मान्य करण्यात आले आहे.
लाँग सर्व्हिस अवॉर्ड : 15 वर्ष लाँग सर्व्हिस अवॉर्ड रुपये 10000/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
अटेंडडन्स अवॉर्ड : रुपये 1000/- देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
वाढदिवस भेट वस्तु : रुपये 700/- मान्य करण्यात आले आहे.
(त्यात प्रत्येक कामगाराची अर्धी 0.5 लिव्ह जमा करण्यात येईल.)
ग्रुप टर्म लाईफ इन्शुरन्स : 25 लाख रुपयांची करण्याचे मान्य करण्यात आले आहे.
EL : साठवणूक मर्यादा 90 करण्यात आली आहे.
मागील सोई सुविधा आहे तश्याच पुढं चालु ठेवण्यात येईल हे ही उभय पक्षाकडून मान्य करण्यात आले आहे.
सदर करार यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी व्यवस्थापनाच्या वतीने,श्री.राजेश त्यागी (मॅनेजिंग डायरेक्टर), श्री.निखिल पुजारा (डायरेक्टर), श्री.मलिंद वत्स (प्लॅन्ट हेड), श्री.योगेश वाणी (जनरल मॅनेजर एच.आर.हेड), श्री.अशोक यादव (जनरल मॅनेजर अकाऊंट, फायनान्स), श्री.लिंबराज कदम (मॅनेजर एच.आर.) तसेच युनियनच्या वतीने श्री.अमोल निकम (अध्यक्ष), श्री.जितेंद्र भागवत ( जनरल सेक्रेटरी), श्री.दत्तात्रय पाटील (उप.अध्यक्ष), श्री. पंडीत हणमंते (खजिनदार), श्री. धर्मेंद्र साबळे (सदस्य) यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
सदर करार संपन्न होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन श्री.महेंद्र कदम (टाटा मोटर्स कामगार प्रतिनिधी) तसेच कामगारांच्या हितासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व मान्यवरांचे सहकार्य लाभले अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
व्यवस्थापनाची सामंजस्याची भूमिका आणि सकारात्मक दृष्टिकोन आणि संघटनेच्या सर्व सभासदांनी राखलेल्या संयम, अभेद्य एकजूट, केलेले सहकार्य, संघटना आणि संघटनेतील प्रतिनिधीवर ठेवलेला विश्वास यांच्या बळावर हा करार यशस्वीरित्या संपन्न झाला.