एशियन पेंटस् लिमिटेड (Asian Paints Ltd.) येथे वेतनवाढ करार संपन्न

शिरवळ,सातारा : शिरवळ,सातारा येथील एशियन पेंटस् लिमिटेड (Asian Paints Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि एशियन पेंटस् एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये तिसरा वेतनवाढ करार सोमवार दि.18/11/2024  रोजी संपन्न झाला.

    सदर वेतनवाढ करार हा एशियन पेंटस् एम्प्लॉईज युनियन, खंडाळा संघटनेचे अध्यक्ष श्री. विवेक वाघमारे व संघटनेचे पदाधिकारी  यांच्यावर संघटनेच्या सभासदांचा असणारा अभूतपूर्व विश्वास व संघहितासाठी काहीही करण्याची तयारी व कंपनीचा कामगारांच्या कौशल्य, गुणवत्ता,सुरक्षा, शिस्त यावर पूर्ण विश्वास यामुळे  ८ महिन्यांच्या कालावधीनंतर पूर्णतः आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. 

वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :

करार कालावधी : सदर करार हा माहे १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जुलै २०२७ अशा तीन वर्षाकरिता करण्यात आला.

पगारवाढ : ३ वर्षासाठी २०४४७ /- रुपये  इतकी भरघोस पगारवाढ देण्याचे मान्य केले . या करारानंतर जास्तीत जास्त (CTC) सिनियर कामगाराला ८०९००/- (12 वर्षे ) रूपये आणि कमीत कमी ज्युनियर कामगाराला 52000/- (1 वर्ष )रुपये इतका पगार असेल. सर्वांना समान पगार वाढ आणि service weightage नुसार कमी जास्त असू शकतो

झालेला करार हा पुढील तीन वर्षासाठी लागू असून संपूर्ण रक्कम प्रथम वर्षामध्ये  १००% रक्कम देण्याचे उभयपक्षी मान्य केले आहे.

करार फरकाची रक्कम : फरक (एरियस्) १००% करारावर स्वाक्षरी केल्यानंतर  देण्याचे मान्य केले आहे.(ऑगस्ट ते ऑक्टोबर )

सर्व वाढीव रकमेपैकी 52-55% रक्कम ही मूळ वेतनात वाढवण्यात आली.

बोनस :
पुढील ३ वर्षासाठी खालीलप्रमाणे बोनस देण्याचे मान्य केले आहे.
१) पहिल्या वर्षासाठी २०२४ - ४३४००/-
२) दुसऱ्या वर्षासाठी  २०२५- ४७०००/-
३) तिसऱ्या वर्षासाठी २०२६ - ५०६००/- रूपये देण्याचे मान्य केले .

हजेरी बक्षीस (अटेंडन्स अलाउन्स) : पूर्वी प्रमाणे राहील जो रु.५००/-महिना आहे.

रजा : रजा ची सुविधा  मागील १) करारामध्ये  ठरल्याप्रमाणे वर्षाला( XL ३३) व (SL १५) अशा एकूण ४८ सुट्या आहे तशाच चालू राहतील.
२) short leave ४ ने वाढ करून १६ करण्यात आल्या आहे.(गेटपास )

सिजनल प्रोटेक्शन : सिजनल प्रोटेक्शन मध्ये एक स्वेटर वाढून देण्याचे मान्य केले आहे  
१) पाहिले वर्ष -  जॅकेट 
२) दुसरे वर्ष.   -   रेनकोट आणि स्वेटर 
३) तिसरे वर्ष. -   जॅकेट देण्याचे मान्य केले आहे.

स्वीट आणि ड्रायफुड :
१) अर्धा किलो स्वीट  नव्याने वाढवून खंडेनवमी या दिवशी देण्याचे मान्य करण्यात आले आहे
२) ड्रायफुडची २५०ग्राम ने वाढून पूर्ण १ किलो व अर्धा किलो मिठाई दिवाळीला (पूर्वीप्रमाणे) देण्याचे मान्य करण्यात आले आहे

कॅन्टीन सुविधा : कॅन्टीन मध्ये नव्याने नॉनव्हेज देण्याचे मान्य करण्यात आले आहे

बिगर व्याजी लोन : बिगर व्याजी लोन रु.65000 /- मध्ये वाढ करून १ लाख रुपये प्रतिवर्ष  देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

बाकी सर्व सोईसुविधा ह्या पूर्ववत चालू ठेवण्याचे मान्य करण्यात आले आहे.

     सदर करारकरिता कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने श्री. कलम चौडा ( AGM- MFG), श्री. शिवम शौर्य (HR Sr.managerHR&Admin), श्री. महेश बारसकर (QA senior manager), श्री. ध्रुव जानी (Production Manager), श्री. तेजवीर शर्मा (Sr. Mngr -Engg), श्री. राहुल मेहता (HR manager), श्री.अमोल पाटील (HR-manager) तसेच संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री विवेक हनुमंत वाघमारे, उपाध्यक्ष श्री.महेश पुहन, जन सेक्रेटरी श्री.गुलजार मोहम्मद, सह.सेक्रेटरी श्री.सुशांत अविनाश पवार, खजिनदार श्री.आबासाहेब एकनाथ काटे, सदस्य श्री. प्रविण भाऊसाहेब राऊत, श्री. चिंतामणी डी यांनी काम पाहिले.

    एशियन पेंटस लिमिटेड कंपनीमधील सर्व कामगार यांनी केलेले सकारात्मक काम, राखलेला संयम, सहकार्य व महत्वाचे म्हणजे युनियन प्रतिनिधी यांच्यावर ठेवलेला विश्वास याच्या बळावर हा करार यशस्वी आणि शांततामय वातावरणात संपन्न झाला असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.