महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (Maharashtra Enviro Power Limited) वेतनवाढ करार संपन्न

पुणे : अनेक अडथळे पार करीत तसेच कामगारांची एकजूट व कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे रांजणगाव एमआयडीसी येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (Maharashtra Enviro Power Limited)आणि महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर कामगार संघटना यांच्या मध्ये 07/11/2024 रोजी वेतनवाढीचा करार संपन्न झाला. 

वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे : 

करार कालावधी : सदर करार दि. 01 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2027 तीन या वर्षांकरिता  झालेला आहे. 

पगारवाढ : सदर करारापोटी कामगारांना सरसकट तीन वर्षांकरिता रुपये 10100/-(दहा हजार शंभर) इतकी थेट वाढ (In Hand) देण्यात आली आहे. 
पहिले वर्ष :- 4040/-रुपये, दुसरे वर्ष :- 3030/-रुपये, तिसरे वर्ष :- 3030/-रुपये.
दि.01 एप्रिल 2024 पासून ची फरकाची रक्कम दोन टप्प्यात कामगारांना मिळणार आहे.

बोनस : सदर करारातील तरतुदीनुसार कामगारांना 15 टक्के बोनस मिळणार आहे. 
तसेच बोनस कायद्याच्या कक्षेत नसलेल्या कामगारांना सुद्धा 15 टक्के दराने सानुग्रह अनुदान देण्याची खास तरतूद करारामध्ये केली आहे.

     ड्रायव्हर कामगारांना मिळत असलेल्या नाष्टा,जेवण भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल अलाऊन्स मध्ये  200 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

      सध्या मिळत असलेल्या सुविधा म्हणजे फॅमिली डे, मॅरेज गिफ्ट,मेडिकल फॅसिलिटी,डेथ क्लेम पॉलिसी, वार्षिक रजा, पेड हॉलिडे, दिवाळी गिफ्ट, युनिफॉर्म, कॅन्टीन सुविधा व इतर सुविधा यापुढेही  मिळणार आहे.

कराराचे वैशिष्ट्य : आतापर्यंत मागील झालेल्या तीन कराराचे कालावधी पाहता सदर करार हा मागील करार संपुष्टात आल्यानंतर एकही दिवसाचे नुकसान न होता लगेचच नवीन कराराचा लाभ सभासदांना मिळवून देण्यात संघटना यशस्वी झाली आहे.

     तसेच करार यशस्वी होण्यामध्ये मा. समेट अधिकारी श्री. वाळके यांचे महत्त्वपूर्ण योगदान व मार्गदर्शन मिळाले आहे. संघटनेचे सल्लागार व रणनीतीकार श्री मारुती जगदाळे यांचे यामध्ये खूप मोठे योगदान आहे. तसेच श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष श्री.किशोर सोमवंशी, जनरल सेक्रेटरी श्री.रोहित पवार,ज्येष्ठ सल्लागार श्री.दिलीप पवार, आधारस्तंभ तसेच मार्गदर्शक नगरसेवक  मा.उपमहापौर श्री. केशव घोळवे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

     सदर वेतनवाढ करारावर व्यवस्थापनाच्या वतीने डायरेक्टर-श्री.आसिफ हुसेन सर, ए जी एम-श्री.गणेश नरवडे, सि.एच आर-सौ.पूर्वा वैद्य,डेप्युटी मॅनेजर अकाउंट-श्री.सिकंदर पठाण तसेच संघटनेच्या वतीने अध्यक्ष- श्री.अरुण घुले,जनरल सेक्रेटरी-श्री.जैनुद्दीन शेख,उपाध्यक्ष-श्री.अमर पडवळ उपाध्यक्ष-श्री.दत्ता मालोदे, खजिनदार-श्री.जगदीश पवार यांनी तसेच साक्षीदार म्हणून संघटनेचे सल्लागार श्री.मारुतीराव जगदाळे साहेब यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.