पिंपरी : TKIL Industries Pvt. Ltd (थिसेनकुप इंडस्ट्रिज इंडिया) कंपनी व्यवस्थापन व थिसेनकुप इंडस्ट्रिज वर्कर्स युनियन यांच्यामध्ये मैत्रीपुर्ण करार खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.
वेतनवाढ करारातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे :
कराराचा कालावधी : १ सप्टेंबर २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२७ या तीन वर्षा च्या कालावधीसाठी असेल.
३ वर्षासाठी टप्पे खालीलप्रमाणे :
१. प्रथम वर्षासाठी ९०%
२. द्वितीय वर्षासाठी ५%
३. तृतीय वर्षासाठी ५ %
विशेष म्हणजे मुळ पगारामध्ये ६०% रक्कम देण्याचे मान्य केले आहे.
१. सेकंड शिफ्ट - ७०/-
२. थर्ड शिफ्ट - १०० /-
कंपनी मध्ये जेंव्हा भरती असेल तेंव्हा कामगारांच्या मुलांना प्राधान्य दिले जाणार
पितृ पालकत्व रजा हया ३ दिवस देण्यात आल्या आहेत.
वाढदिवस रजा :
कामगाराचा वाढदिवस, ॲनव्हर्सरी किंवा सनवार यापैकी एक दिवस सुट्टी घेवू शकता.
दुःखवटा रजा :
प्रत्येक कामगाराच्या घरी कोणाचे दुःखद निधन झाले तर त्या कामगाराला ३ दिवस सुट्टी देण्याचे मान्य केले आहे.
या सर्व रजा या ॲग्रीमेंटला चालू करण्यात आल्या आहेत.
लोन : ४ % व्याजदराने सर्व लोन मिळुन २२लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे.
मेडिक्लेम सुविधा :
मेडिक्लेम पॉलिसी ५ लाख रुपये करण्यात आली आहे. एक्स्ट्रा २ लाख वाढवु शकता. (स्वतः कामगार, पत्नी, दोन मुले व आई वडील.) बफर पॉलिसी पुर्विप्रमाणे आहे तशीच चालू आहे.
मरणोत्तर विमा पॉलिसी :
एखादया कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या फॅमिलीसाठी ५० लाख रुपये देण्यात येतील.
तसेच व्यवस्थापन व युनियन यांच्या चांगल्या संबंधाबद्दल व्यवस्थापनाने प्रत्येक कामगारास एकरकमी १७ हजार १ रुपये बक्षीस स्वरुपात देण्याचे ठरवले आहे तसेच एक महिना अगोदरपासुनच अॅग्रीमेंटचा मोबदला कामगारांना दिला गेला आहे हा मेसेज इतर कंपनीने घेण्याजोगा आहे.
यावेळी व्यवस्थापनातर्फे विवेक भाटीया, (मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ) पेंडसे, (सीएफओ आणि होलटाईम डायरेक्टर) गिरणीकर, (मॅन्युफॅक्चरींग डायरेक्टर) स्मारक ((हेड- एच आर, ओएसएचई, ॲडमिन आणि सीएसआर), शितल कुलकर्णी (लिगल हेड), गावस्कर मॅडम, मोहिते , प्रदिप सर तसेच युनियनतर्फे अध्यक्ष रामचंद्र वाईगडे, जनरल सेक्रेटरी विपुल बिरंजे, खजिनदार निरज सनस, कार्याध्यक्ष शंकर घनवट, सदस्य शरद लांडगे, व वैजनाथ रावळे यांनी करारावर स्वाक्ष-या केल्या. या वेतन करारासाठी शिल्पा छाषिया मॅडमांचे मोलाचे सहकार्य लाभले.