नागपूर : आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारे आयोजित केली जाणारी कामगार सांख्यिकी शास्त्रज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद ही सदस्य राष्ट्रांना कामगार वर्गाशी संदर्भात काही शिफारशी सुचवित असून त्यालाच अनुसरून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने पुढील काळात भारतात कामगार क्षेत्रासाठी या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आधारित मानकांवर सर्वेक्षण करणार असल्याची माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय,नागपूरचे उपमहासंचालक श्रीनिवास उप्पला यांनी भारतीय खाण ब्यूरो, इंदिरा भवन, सिव्हिल लाईन्स नागपूर येथे कामगार सांख्यिकी शास्त्रज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषदेच्या एक दिवसीय परिषदेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात दिली असे वृत्त अभिजित भारत वृत्तसंस्थेने दिले आहे.
19 व्या आयसीएलएसच्या सर्वेक्षणात केलेल्या शिफारशींवर पुढील तीन महिन्याच्या काळात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय तर्फे सर्वेक्षण होणार असून या परिषदेची संपूर्ण मानके योग्यरीत्या सर्वे मध्ये समाविष्ट असलेल्या प्रश्नोत्तरात अवलंबली गेली पाहिजे यासाठी अधिकारी वर्गाने या प्रशिक्षणाला गांभीर्याने घ्यावे असे त्यांनी सांगितले.
तसेच सदर परिषदेमधील मानक ही आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राह्य धरली जात असून राष्ट्रीय स्तरावर यांचा तुलनात्मक आणि अचूक अभ्यास होणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेत निर्देशित ठराव आणि मानक केंद्र सरकारसाठी धोरणनिर्मिती योजनानिर्मिती मध्ये महत्वाची असल्याच त्यांनी यावेळी सांगितले. 19 व्या आयसीएल सर्वेक्षणाच्या शिफारशीनुसार श्रमिक बाजारावरील माहिती संकलित करण्याच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करणे,माहितीचा संकलनासाठी तयार केलेल्या सर्वेक्षण साधनांची परिणामकारकता तपासणे तसेच 2023 मध्ये झालेल्या आयसीएलए सर्वेक्षणाच्या मागील अभ्यासाच्या निष्कर्षांची पुष्टी करणे इत्यादी उद्दिष्टे या प्रशिक्षण वर्गातून सफल होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आयसीएलएसच्या परिषदेतून संमत झालेले ठराव आणि त्याची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी केला जाणारा सर्वे हा अचूक असावा जेणेकरून भारतातील कामगार वर्गाची योग्य माहिती उपलब्ध होईल यासाठी सदर प्रशिक्षण उपयोगी राहणार असल्याचा विश्वास राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय रायपूरचे उपमहासंचालक अल्ताफ हुसेन यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येणाऱ्या पिरॉडिक लेबर फोर सर्वे अर्थात नियतकालिक श्रमबल सर्वेक्षणामधील संकल्पना आयसीएलएसच्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये वापरून हा सर्वे पूर्ण करण्यात येणार आहे.आयसीएलएसच्या अहवालानुसार कामगार वर्गाचे पाच भागात विभाजन करण्यात आले असून प्रत्येक विभागाची स्वतंत्र अशी माहिती उपलब्ध होणार आहे. या प्रशिक्षण वर्गाचा मोठा असा फायदा प्रअधिकारी वर्गाला राहणार असल्याची भावना राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय कोलकाताचे उपमहासंचालक तारकचंद पात्रा यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी,भारत सरकार, पश्चिम क्षेत्र, नागपूर यांच्या तर्फे कामगार सांख्यिकी शास्त्रज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषदेच्या एक दिवसीय परिषदेच्या अनुषंगाने अधिकारी वर्गाचे प्रशिक्षण कार्यक्रम भारतीय खाण ब्यूरो,इंदिरा भवन,सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे सुरू आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय,घरगुती सर्वेक्षण प्रभाग आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, मुख्यालय, दिल्ली ह्यांच्या अधिकारी वर्गासोबत महाराष्ट्र, गुजरात आणि छत्तीसगढ राज्यांतील जवळजवळ 100 क्षेत्रीय अधिकारी प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. हे प्रशिक्षण शिबिर श्रीनिवास उप्पला उपमहासंचालक,राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय नागपुर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.