कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता दावरा यांनी नोएडा येथील वराहगिरी वेंकट गिरी राष्ट्रीय कामगार संस्थेत 21 ते 22 ऑक्टोबर 2024 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या “सामाजिक सुरक्षा योजना, कामगार संहिता आणि बीओसीडब्ल्यू - एमआयएस पोर्टल” या दोन दिवसीय क्षमता निर्माण कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
या कार्यक्रमाला देशाच्या विविध विभागातील 30 हून अधिक आयुक्त उपस्थित होते. यामध्ये कल्याण आयुक्त, उप कल्याण आयुक्त, सहाय्यक कल्याण आयुक्त आणि कल्याण प्रशासक यांचा समावेश होता. विविध क्षेत्रांतील असंघटित कामगारांचे कल्याण सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या अधिकाऱ्यांची समज आणि कौशल्ये अधिक मजबूत करण्यासाठी मंत्रालयाच्या व्यापक उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आपल्या भाषणात सचिवांनी असंघटित, अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.