खंडाळा : येथील एम.आय.डी.सी मधील इलजीन ग्लोबल इंडिया प्रा. लि. (ILJIN GLOBAL INDIA PVT LTD.) कंपनी व्यवस्थापन आणि शिवगर्जना कामगार संघटना यांच्यामध्ये दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी मैत्रीपूर्ण, आनंदी आणि शांततामय वातावरणात जल्लोषात वेतनवाढ करार संपन्न झाला. वेतनवाढ करार हा १६५०० रुपये एवढा भरघोस करण्यात आला.
वेतनवाढ करारतील ठळक मुद्दे खालील प्रमाणे :
करार कालावधी : वेतनवाढ करार हा दि. १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२७ राहील
कराराची रक्कम ही तीन वर्षासाठी
प्रथम वर्ष = ८४०० रुपये
द्वितीय वर्ष = २३०० रुपये
तृतीय वर्ष = २३०० रुपये
अशी करण्यात आली आहे.
सात महिन्याचा संपूर्ण फरक पुढील पगारात एकरकमी देण्यात येईल हे मान्य करण्यात आले.
मेडिक्लेम पॉलिसी : मेडिक्लेम पॉलिसी sum Assured तीन लाखापर्यंत मान्य करण्यात आली. त्यामध्ये स्वतः, आई, वडील, पत्नी, आणि दोन मुले यांचा समावेश करण्यात आला. मेडिक्लेम पॉलिसीचा प्रीमियम हा सीटीसीचा भाग राहणार नाही असे कंपनी व्यवस्थापनाकडून मान्य करण्यात आले.
रजा : सध्या असलेल्या रजांमध्ये ०५ रजा वाढविण्यात आल्या.
दिवाळी बोनस : संघटनेशी चर्चा करून देण्याचे मान्य करण्यात आले.
गणवेश : प्रतिवर्षी ३ टी शर्ट आणि १ सेफ्टी शुज देण्याचे मान्य करण्यात आले, तसेच तीन वर्षातून एकदा टू इन वन जॅकेट देण्याचे मान्य करण्यात आले.
ग्रुप पर्सनल एक्सीडेंट पॉलिसी : ग्रुप पर्सनल एक्सीडेंट पॉलिसी ही १५ लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले.
इतर सुविधा : बस सुविधा, कॅन्टीन व इतर सोयी सुविधा या आहे तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत व त्यासंबंधी कोणत्याही प्रकारचे कटिंग पगारातून करण्यात आलेले नाही.
गेट-टुगेदर : हे वर्षातून एकदा करण्याचे मान्य करण्यात आले व त्यासंदर्भात दिनांक व ठिकाण मिटिंग करून ठरवण्यात येईल असे म्हणणे मान्य करण्यात आले.
स्पोर्ट्स डे : वर्षातून एकदा स्पोर्ट्स डे घेण्याचे मान्य करण्यात आले.
वारसास नोकरी : कामगार सभासदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला कायमस्वरूपी नोकरी देण्यात येण्याचे मान्य कंपनी व्यवस्थापनाने केले.
कामगारांनी कामाची उत्पादकता तसेच क्वालिटी गुणवत्ता टिकवून काम करण्याचे मान्य करण्यात आले.
हा करार संपन्न होताना कंपनी व्यवस्थापनाकडून श्री. धर्मेंद्र परमार (मार्केटिंग आणि सेल्स हेड), श्री. भास्कर पोमन (एच. आर. हेड), श्री. अजिनाथ शिंदे (एच. आर. मॅनेजर), श्री. धीरज गाढवे (प्लांट मॅनेजर) व संघटनेच्या वतीने श्री. संतोष ( आण्णा) बेंद्रे (अध्यक्ष), सर्व कामगार प्रतिनिधी आणि सर्व कामगार सभासद उपस्थित होते.
करार संपन्न होताना व्यवस्थापनातील श्री. धर्मेंद्र परमार, श्री. भास्कर पोमन, तसेच संघटनेचे अध्यक्ष श्री. संतोष (आण्णा) बेंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व कामगार सभासदांना कंपनीच्या आणि कामगारांच्या हिताचे मार्गदर्शन केले. अशाप्रकारे संपूर्ण करार हा मैत्रीपूर्ण संबंधात, आनंदात आणि जल्लोषात पार पडला.
