छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी येथील एबी इनबेव्ह इंडिया लिमिटेड (AB InBev India Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि छत्रपती संभाजी नगर मजदूर युनियन (सीआयटीयु संलग्न) यांच्यामध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.
वेतनवाढ करारतील ठळक मुद्दे खालील प्रमाणे :
करार कालावधी : दि. 01 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2027 या 03 वर्ष कालावधीसाठी राहील.
पगारवाढ. - रु.17250/-
एल टी ए - रु. 1550/-
बोनस/सानुग्रह अनुदान - रु.2000/-
पी एफ आणि ग्रॅज्यूएटी - रु.1015 /-
बेनिफिट्स - रु.776/-
पि एल आय एस - रु.500/-
एकूण वाढ/monthly = रु. 23091 /-
वेतनवाढ फरक : एप्रिल ते ऑगस्ट पाच महिन्यांचे एरियस म्हणून 60 हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे.
2024 - रु.27000 /-
2025- रु.27000 /-
2026- रु.27000 /-
2027- रु.27000 /-
2024- रु.48600/-
2025- रु.48600/-
2026- रु.48600/-
2027- रु.48600/-
2024- रु.24000/-
2025- रु.24000/-
2026- रु.24000/-
2027- रु.24000/-
अप्रत्यक्ष वेतन वाढ व सुविधा :
A) वैद्यकीय विमा (MEDICLAIM POLICY) :- (CTC - OPD साठी वार्षिक रु.15000/- फिक्स)
I) सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये वर्षातून एकदा पूर्णपणे मेडिकल चेकअप .
II) मेडिक्लेम पॉलिसीची मर्यादा 5 लाख रुपये असून 10 लाख रुपये इमर्जन्सी साठी बफर अमाऊंट करण्याचे मान्य करण्यात आले आहे.
III) वर्षातून एकदा स्थानिक युनियन ची नॅशनल मॅनेजमेंट सोबत बिझनेस अपडेट युनियनच्या प्रश्नांविषयी मीटिंग
IV) वूमन वर्कर ॲक्शन कमिटी बनवून त्यामध्ये युनियनच्या पदाधिकाऱ्यांचे स्थान असणे मान्य केले.
V) अपघात विमा(GPA POLICY):-पोलिसी एखादा कामगार अपघातामध्ये मृत्यूमुखी पडल्यास त्याच्या परिवाराला त्याच्या वार्षिक CTC च्या तीन पट अमाऊंट देण्यात येईल.
सहायता निधी (BENOVELONT FUND) :-
Vl) कायमस्वरूपी अपंगत्व आल्यावर युनियन व मॅनेजमेंट चर्च्या करून नुकसान भरपाईचा निर्णय घेईल.
Vll) नाईट शिफ्टला नाश्ता चालू केला जाईल.
Vlll) दिवाळी गिफ्ट म्हणून प्रत्येक कामगारला 3000₹देण्यात येतील.
IX) पेड हॉलिडे - दि.02 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती ही राष्ट्रीय सुट्टी वाढ करण्यात आली. त्यामुळे एकूण सर्व 12 पेड हॉलिडे ची संख्या झाली आहे.
X) फेस्टिवल ऍडव्हान्स म्हणून दिवाळीला रु.30000/- देण्यात येतील.
Xl) ओव्हरटाइम - ओव्हरटाइम हा पूर्वी डी ए बेसिकच्या दुप्पट होता परंतु आता तो पूर्ण ग्रॉसच्या दुप्पट करण्याचे मान्य केले.
Xll) VDA- बॉम्बे इंडेक्स 1960 ची ओल्ड सिरीज कायम ठेवून पूर्वी वाढता महागाई भत्ता 2.25 ₹/ पॉईंट होता त्यामध्ये 0.25 पैसे वाढ करून तो 2.50 ₹ करण्यात आला.
Xlll) कामगारांना कामाच्या ठिकाणी मोटिवेशन मिळण्यासाठी जी स्क्रीन पॉलिसी मॅनेजमेंट साठी आहे ती कामगारांना देण्यात आली.
कामगार पाल्यांसाठी लाभ/सुविधा ( Employee Child Benefit ) :
A) शैक्षणिक विषयक :- कामगारांच्या पाल्यांसाठी उच्च शिक्षणा बाबत रु.5000/- व सत्कार योजना तयार करून राबविण्यात येईल.
B) रोजगार विषयक :- नवीन कामगार परमनंट करण्या विषयी मॅनेजमेंट मध्ये चर्चा होऊन नवीन कामगार वाढण्याचे ठरविण्यात आले
उपहारगृह व वाहतूक सुविधा :
पूर्वीप्रमाणे कामगारांना पंधरा रुपयात चांगल्या प्रकारचे जेवण व दोन चहा व नाश्ता मोफत देण्यात येईल.
इतर सुख सुविधा :- पूर्वीपासून चालत आलेला आहे ईतर सुख सुविधा जसे की ड्रेस, बूट, कॅन्टीन, बस सुविधा, फॅमिली गेट-टुगेदर, स्पोर्ट्स अरेंजमेंट, ॲनिवल गेट-टुगेदर, बॅचलर पिकनिक या सर्व सुख सुविधा मोफत चालू राहतील मान्य करण्यात आलेला आहे.
हा करार यशस्वी करण्यासाठी कंपनी व्यवस्थापन तर्फे राम चंद्रशेखर (इंडिया एच आर हेड), संदीप दुबे (प्लांट व्हॉइस प्रेसिडेंट), ईशान ओव्हाळे (प्लांट सीनियर एच आर मॅनेजर) तसेच कॉम्रेड अजय उद्धव भवलकर (छत्रपती संभाजीनगर मजदूर युनियनचे जिल्हा सेक्रेटरी) तसेच स्थानिक कमिटीचे पाल्स आणि फोस्टर नागनाथ बडे, विजय खरे, समाधान सुरसे, अनिल सावंत, अशोक पारधे, विजय कांबळे, नंदू ठोंबरे यांनी प्रयत्न केले व त्यांना सर्व युनियन सभासदांनी सहकार्य केले.
तसेच सिटूचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड डी एल कराड व आय यु एफ चे प्रवीण खोतकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. तसेच कॉम्रेड प्रदीप गाढवे ( उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर मजदूर युनियन ) यांचे विशेष सहकार्य लाभले.
वेतनकरार 2024 यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल सर्व सभासदांचे संघटनेकडून हार्दिक अभिनंदन. सर्व सभासदांनी एकजुटीने केलेले सहकार्य व संयम राखून शांततामय वातावरण अबाधित ठेवल्याबद्दल तसेच उत्पादन व गुणवत्ता याचे प्रमाण कायम राखले यासाठी संघटनेच्या वतीने सर्व सभासद कामगार बांधवांचे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले.
