जे.सी.बी. इंडिया लिमीटेड (JCB India Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

मावळ,पुणे : तळेगाव औद्योगिक नगरीतील जे.सी.बी. इंडिया लिमीटेड (JCB India Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि जे.सी.बी.कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढीचा  करार दि. 4 जुलै 2024 रोजी शांततामय, आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :

करार कालावधी : सदर करार दि.1 जुलै 2024 ते 30 जून 2027 या 3 वर्ष कालावधीसाठी लागू असेल.

वेतनवाढ : रु.20,950/- वेतनवाढ करण्यात आली
पहिला वर्ष : रु.14,665/-
दुसरा वर्ष  : रु.4,190/-
तिसरा वर्ष : रु.2,095/-

मेडीक्लेम पॉलिसी : मेडीक्लेम 6 लाखावरुन 8 लाख रुपये करण्यात आला आहे. 8 लाखांच्या वरील 5 असोसिएटसचा खर्च कंपनी करेल. 

हॉस्पिटल रुमरेंट : रुमरेंट रु.3,000/- वरुन रु.4,000/- करण्यात आला आहे,

डोळ्यांचे आजार : डोळ्यांचे आजार ( मोतिबिंदू) उपचार खर्चाची मर्यादा रु.25,000/- वरुन 30,000/- करण्यात आली आहे.

टर्म इन्शुरन्स : टर्म इन्शुरन्स पॉलिसी रु.40 लाखावरुन रु.55 लाख करण्यात आली आहे.

ग्रुप पर्सनल एक्सीडेंट : GPA रु.10 लाखावरुन रु.15 लाख करण्यात आला आहे. 

वार्षिक हेल्थ चेक अप : वार्षिक हेल्थ चेकअप मध्ये सोनोग्राफी ॲड करण्यात आली आहे.

क्राॅस जेंडर ॲडीशन : क्राॅस जेंडर ॲडीशन यामध्ये आई वडील - सासु सासरे ॲड करण्यात येणार आहे.

EL चा स्लॅब : EL चा स्लॅब 272 दिवसाला 21 रजावरुन 266 दिवसांना 21 रजा मिळतील.

EL रजा : EL रजा वर्षाच्या सुरुवातीपासून सिंगल कितीही वेळा घेता येईल.

EL रजा साठवणूक : EL रजा साठवणूकीची मर्यादा 50 रजा वरुन 55 रजा करण्यात आली आहे.

वार्षिक हजेरी बक्षीस : वार्षिक हजेरी बक्षीस 281 दिवसाला रु.3000/- इतके 40 कामगारांना मिळेल.

Award and Reward : ब्लाॅक क्लोजर व एनपीडीचे दिवस LTA Award Reward बोनस EL,CL,SL साठी ग्राह्य धरले जातील.

कॅन्टीन : 
- आठवड्यातून तीन दिवस पूर्ण फळ देण्यात येईल .
- आठवड्यातून दोन दिवस अंडी देण्यात येईल .
- नाईट शिफ्ट ला सकाळी नाश्ता देण्यात येईल .

स्पोर्ट : इंडस्ट्रियल स्पोर्ट इव्हेंट मध्ये क्रिकेट,कबड्डी, हॉलीबॉल (शूटिंग/पासिंग ) व इतर खेळांचा समावेश केला जाईल.

शैक्षणिक उचल : शैक्षणिक उचल रु.30,000/- वरून रु.45,000/- करण्यात आली आहे त्या रकमेचे हप्ते समान नऊ हप्त्यांमध्ये करण्यात येईल.

शाॅर्ट लिव्ह : शाॅर्ट लिव्ह वर्षातुन दोनदा घेता येईल.

ब्लॉक क्लोजर : ब्लाॅक क्लोजर 6:4 प्रमाणे मान्य करण्यात आला आहे.

नाईट शिफ्ट भत्ता : नाईट शिफ्ट भत्ता 10 रुपये करण्यात आला आहे.

     यावेळी व्यवस्थापन प्रतिनिधी नवनीत सेठी (बिजनेस हेड पुणे प्लांट), सुधाकर कारी (सिनिअर जनरल मॅनेजर एचआर विभाग), संजीव सोनी (सिनिअर जनरल मॅनेजर असेंबली शाॅप), अतुल कुलकर्णी (सिनिअर जनरल मॅनेजर फॅब्रिकेशन शाॅप), संतोष राऊत (असिस्टंट जनरल मॅनेजर एचआर विभाग), अमर शिंदे (सिनिअर मॅनेजर एचआर विभाग) तसेच संघटना प्रतिनिधी विशाल काळोखे (अध्यक्ष), किशोर भोर (सरचिटणीस), दत्तात्रेय वास्कर (खजिनदार), प्रवीण झोपे (उपाध्यक्ष), बाबासो काळे (उपाध्यक्ष), संतोष भारती, मिनार गजने (सहसरचिटणीस), संजय सिसोदे, खंडेराव जाधव, विनोद फुले, मोहन कटारे (सदस्य) उपस्थित होते.

    सदर करार यशस्वी करण्यासाठी श्रमिक एकता महासंघ, संघटनेचे सल्लागार मारुती जगदाळे सर, तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनेक कंपन्यांमधील पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान लाभले अशी माहिती जेसीबी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आली.