उत्तर विधानसभा मतदारसंघातून संजय पाटील हे शेतकरी संघटनेच्या वतीने निवडणूक लढविणार
कोल्हापूर : शेतकरी संघटनेचे नेते अध्यक्ष श्री रघुनाथ दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजारामपुरी कोल्हापूर येथे श्री संजय पाटील यांच्या निवासस्थानी एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील तसेच जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे उपस्थित होते. परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष तसेच माजी जिल्हाध्यक्ष जनस्वराज्यशक्ती पक्ष श्री संजय पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी बोलताना संजय पाटील म्हणाले, गेल्या वीस वर्षात कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या रेशनच्या विजेच्या महापालिकेच्या प्रश्नांवर शेकडो लक्षवेधी आंदोलने करून त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. रेशनचा काळाबाजार मोडताना प्रसंगी जखमी झालेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत भ्रष्टाचार काळाबाजार मोडून काढताना आज पर्यंत तेरा अधिकारी कर्मचारी यांना निलंबित करावे लागले आहे. माझी लढाई गेली वीस वर्षे कोल्हापूर शहर पाहत आहे या दृष्टीने भविष्यामध्ये संघटनेने संधी दिली तर विधानसभा लढवेल असा विश्वास व्यक्त केला.
श्री रघुनाथ दादा पाटील यांनी श्री संजय पाटील यांची उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली . यावेळी जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे म्हणाले कोल्हापूर उत्तर मधून रघुनाथ दादा पाटील यांनी संजय पाटील यांची उमेदवारी घोषित केलेली आहे आम्ही रघुनाथ दादांच्या आदेशाप्रमाणे उत्तर मध्ये काम करू. यावेळी बोलताना रघुनाथ दादा पाटील म्हणाले करवीर विधानसभा मतदारसंघातून ॲड माणिक शिंदे हे शेतकरी संघटनेचे उमेदवार असतील तर कोल्हापूर उत्तर मधून संजय पाटील आणि हातकणंगले मधून डॉ. प्रगती चव्हाण या उमेदवार असतील. एडवोकेट माणिक शिंदे संजय पाटील आणि डॉ चव्हाण यांनी आत्तापासूनच प्रचाराला सुरुवात करावी असे आदेश रघुनाथ दादा पाटील यांनी दिले.
शहरात राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलने संजय पाटील यांनी केली. अनेक प्रश्न सुटले शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचा अतिरिक्त वाढावा सहा साखर कारखान्याचे अंतर्गत मिळाला ही मोठे यश आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाने शेतकरी संघटनेला अधिक बळकटी येणार असून पक्षाचा विस्तार शहरासह ग्रामीण मध्ये होणार आहे .त्यांच्या आजवरच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीतील आंदोलनाची नोंद घेऊन त्यांनी उत्तर विधानसभा लढवावी. मी त्यांची उमेदवारी उत्तर विधानसभा मतदारसंघ मधून जाहीर करत आहे. आंदोलनांची तडजोड न करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी टोकाचा संघर्ष केला म्हणून त्यांच्यावरती यापूर्वी हल्ला सुद्धा झाला होता. यावेळी संजय पाटील यांनी उत्तर मधून याच बैठकीत शड्डू ठोकला.
यावेळी आभार जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांनी मानले. यावेळी ते म्हणाले संजय पाटलांसारखा लढवय्या कार्यकर्ता पक्षाला मिळाला असून भविष्यामध्ये पक्षाची वाढ होण्यास मदत होणार असून संघटना बळकट होणार आहे. या छोटेखानी मेळाव्यामध्ये अनिल कवाळे संग्राम जाधव पिंटू जाधव प्रकाश पाटील बंकट सूर्यवंशी सैराट पाटील सौरभ पवार बापू पवार तानाजी मोरे अक्षय पैलवान रोहित जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा विविध गावातून विविध भागातून मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने डॉ प्रगती चव्हाण, ज्योतीराम घोडके, नारायण मोरे, सरिता सरीकर, सविता सुतार, मुकुंद मोरे, संतोष सनगर, मुश्ताक मुल्ला, अनिल शिंदे यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.