बारामती : बारामती औद्योगिक वसाहत येथील बाऊली इंडिया बेक्स & स्वीटस प्रा.लिमी. (Bauli India Bakes & Sweets Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्या मध्ये दुसरा वेतन वाढीचा वेतन करार संपन्न झाला.
सदर वेतन करार हा एक जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2026 अशा तीन वर्षासाठी असणार आहे. तीन टप्प्यात 16000 रुपये ची रक्कम दिली जाणार आहे. पहिल्या वर्षात पाच हजार, दुसऱ्या वर्षात पाच हजार, तिसऱ्या वर्षात सहा हजार. अर्जित रजा ची संख्या 3 ने वाढवण्यात आली असून, मेडिक्लेम पॉलिसी प्रत्येकी दोन लाख व ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी कायम ठेवण्यात आली आहे या मध्ये स्वतः, पत्नी दोन मुले व आई- वडील यांचा समावेश आहे, दिवाळीला प्रत्येकी पाच हजार रुपयाचे दिवाळी कूपन भेट मिळणार आहे, सर्व कर्मचाऱ्यांना एक दिवसीय प्रेक्षणीय स्थळी सहल मिळणार व व कर्मचारी मृत्यू सहाय्यता निधी वार्षिक पाच सीटीसी ने देण्यात येणार आहे.
या वेळी कंपनी प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक अभिनंदन ढोके, प्रकल्प प्रमुख नाझीमुद्दिन खाईमी (प्लॅन्ट हेड), एच. आर. मॅनेजर प्रसाद बागडे, असिस्टंट एच आर श्रीदत्त जाधव व कामगार संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य भांडवलकर,सरचिटणीस वैभव कणसे, उपाध्यक्ष गणेश बेलदार, खजिनदार सुरज शेलार, कार्याध्यक्ष अमोल माकर, सदस्य अमोल चव्हाण, प्रवीण लोखंडे आदी नी वेतन करारावर स्वाक्षऱ्या केल्या या प्रसंगी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
या प्रसंगी कर्मचाऱ्यांनी गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला. कर्मचारी व कंपनी प्रशासन याच्या मध्ये उत्तम समनव्य असून येणाऱ्या काळात उत्पादन क्षमता वाढविणे व कंपनीचा नाव लौकिक वाढण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन कामगार संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य भांडवलकर यांनी केले . कंपनी प्रशासन नेहमी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध असल्याचे कंपनी चे व्यवस्थापकीय संचालक अभिनंदन ढोके यांनी सांगितले. सदर करार यशस्वी पणे पूर्ण होण्यासाठी बारामती कामगार कृती समितीचे नानासाहेब थोरात यांनी सहकार्य केले.