चाकण : राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने ०१ मे हा कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. चाकण येथे श्रेया लॉन्स मंगल कार्यालयामध्ये कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री.सुभाष वारे यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी आपल्या मुलांच्या पुढील भविष्यासाठी कामगार कंत्राटीकरण व आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल विस्तृत विश्लेषण केले.
चाकण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. प्रमोदजी वाघ साहेब यांचेही मार्गदर्शन लाभले. त्यांनी महिला कामगारांच्या रक्षणासाठी व प्रश्नासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत याची ग्वाही दिली.त्याचबरोबर कामगार संघटनेच्या कार्यक्रमाला व्यवस्थापनाचे अधिकारी उपस्थित राहिलेत ही खूप वाखणण्यासारखी गोष्ट त्यांनी अधोरेखित केली आणि त्याबद्दल आनंदही व्यक्त केला. राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ या कामगार संघटनेची कार्यपद्धती त्यांना आवडली व प्रामाणिक,सत्य, अहिंसा याची कास धरून पुढे जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांचेही मार्गदर्शन लाभले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार म्हणून निर्भिड पत्रकारितेबद्दल कै.भाई वैद्य स्मृती पुरस्कार खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व सकाळचे पत्रकार श्री. गणेश फलके यांना प्रदान करण्यात आला.त्याचबरोबर पोलीस विभागात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून श्री.विक्रम गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे महासंघाच्या वतीने रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार भूषण पुरस्कार श्री.राकेश चौधरी यांना प्रदान करण्यात आला.
त्याचबरोबर कामगार मित्र पुरस्कार चाकण भागातील चार्टट अकाउंटंट श्री. सचिन सखाराम ढेरंगे यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट औद्योगिक संबंध पुरस्कार यावेळी ॲटलास कॅप्को प्रायव्हेट लिमिटेड आणि ॲटलास कॅप्को एम्प्लॉईज फेडरेशन यांना संयुक्तपणे देण्यात आला. तसेच नव्याने चालू केलेला कामगारांच्या पतसंस्थेसाठी देण्यात येणारा पुरस्कार याझाकी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड केसनंद यांना देण्यात आला.
यावेळी अनेक व्यवस्थापनाचे अधिकारी उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने कोजेमे प्रिसीजन पार्टस इंडिया प्रा.ली.चे असिस्टंट मॅनेजर- एच.आर.आणि ॲडमिन श्री.उल्हास शिरीष कलाल,सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कारपोरेशन प्रायव्हेट लिमिटेड म्हाळुंगे चाकणचे एच. आर.अँड आय.आर. सीनियर मॅनेजर श्री.विश्वास भोंग, ए.सी.जी. पॅम फार्मा टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड शिरवळचे एच.आर. अँड अँडमीन मॅनेजर, श्री. दीपक पाटील साहेब,ॲटलास कॉप्को (ई) प्रा लि.चे एच.आर. सीनियर ऑफिसर सौ. पूनम सपकाळे मॅडम, गेस्टॅप आटोमोटिव इंडिया प्रा.लि.चाकणचे डेप्युटी एच.आर.मॅनेजर श्री. बालाजी डोईफोडे,या कंपनी व व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच यावेळी प्रस्तावित महासंघाचे सचिव श्री.अविनाश वाडेकर यांनी सादर केली. त्याचबरोबर महासंघाचे उपाध्यक्ष श्री.राजू अण्णा दरेकर व महासंघाचे कार्याध्यक्ष श्री. दत्तात्रय येळवंडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर मनोगत महासंघाचे खजिनदार श्री. गणेश जाधव यांनी केले. महासंघाचे अध्यक्ष श्री.ॲड किशोरजी ढोकले यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये बदलणारे कामगार कायद्याबद्दल विश्लेषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासंघाचे उपाध्यक्ष श्री.रुपेश वर्पे यांनी केले.महासंघाचे उपाध्यक्ष श्री श्यामसुंदर पडोळे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमात महासंघाचे व जवळजवळ १५० पेक्षा जास्त संलग्न संघटनेचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. त्यात मुख्यत्वे रमेश सातपुते, राहुल कुटे,सम्राट मुंगसे, राजाराम शिंदे,नितीन हरगुडे, अमित येळवंडे,प्रवीण मोहिते,कैलास शिंदे,बाळासाहेब डेरे,अक्षय मुंगसे,गणेश गवारी, विकास राक्षे, प्रवीण कांबळे उपस्थित होते.
