पुणे : १ मे जागतिक कामगार व महाराष्ट्र दिनानिमीत्त श्रमिक एकता महासंघाच्या माध्यमातुन बदलते कामगार कायदे व कामगारांविषयी सरकारची ऊदासिनता व भांडवलधार्जिणे धोरण या विषयी कामगारांमध्ये जागृती निर्माण करून कामगार चळवळीला दिशा देण्याच्या दृष्टिने सोमवार दि.१ मे २०२४ रोजी पिंपरी चिंचवड शहरामध्ये महारॅलीचे आयोजन करण्यात आले.
महारॅली सकाळी टिक ८.३० वा. विश्वकल्याण कामगार संघटना कार्यालय (बजाज ऑटो) गेटपासून मोटरसायकल वरून सुरू होईल. निगडी चौक, पुणे-मुंबई हायवेने, खंडोबा माळ, थरमॅक्स चौक, कस्तुरी मार्केट, कृष्णानगर (भाजी मंडई), घरकुल चौक शाहुनगर, के एस बी चौक, चिंचवड स्टेशन मार्गे रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे सर्वजण एकत्र येत कामगार मेळावा आयोजीत करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन श्री आशुतोष भटटाचार्य साऊथ एशिया रिजनल सेक्रेटरी इंडस्ट्री ऑल, संघटक प्रविण राव उदघाटक म्हणुन ॲड उमेश शिवाजी गोपाळे अध्यक्ष लेबर लॉ पॅक्टिशनर्स असोशियशन हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर पाराजी सोमवंशी हे होते. श्रमिक एकता महासंघाचे महासचिव रोहीत पवार यांनी प्रस्ताविक केले.
श्रमिक एकता महासंघाच्या माध्यमातुन कामगार लढे व कामगारांचा संघर्ष पत्रकारीतेच्या माध्यमातून पारदर्शकपणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून उल्लेखनीय कार्य केल्याबददल कामगार चळवळीचे जनक रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे हा पुरस्कार श्री.सचिन कृष्णाजी बर्गे दै. महाराष्ट्र न्युज संपादक शिरवळ आणि प्रा.महादेव अंबादास वाघमारे मावळ २४ तास संपादक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच व्यवस्थापन आणि कामगार कर्मचारी यांच्यातील परस्पर संबंध सलोख्याचे ठेऊन फक्त कामगार, कर्मचाऱ्यांची भरभराट न होता उदयोगाचे हित जोपासुन आद्योगिक क्षेत्रात आदर्श ठेवत असल्यामूळे श्रमिक एकता महासंघाच्या वतीने "जागतिक कामगार दिनानिमित्त" "राजर्षी शाहु महाराज पुरस्कार देऊन नितीन विजयकुमार आसलकर एच आर हेड विलो लि. यांना गौरविण्यात आले.
श्रमिक एकता महासंघाच्या वतीने लढाऊ कामगार संघटना" हा पुरस्कार सेंडविक एशिया एम्प्लॉईज पुनियन व ए.एस.ए. एल कामगार संघटना यांना देण्यात आला.
सध्याच्या केंद्र व राज्य सरकारने कामगार विरोधी कायदे आणून कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला असल्याने सध्याच्या सरकारच्या विरूध्द इतर विरोधी पक्षाच्या उमेदवारांना लोकसभेसाठी मतदान करण्याचे आव्हान करण्यात आले. त्याचबरोबर मावळ मतदार संघाचे विद्यमान उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा देऊन निवेदन देण्यात आले. या मेळाव्यास संजोग वाघेरे पाटील, मानवजी कांबळे, मारुती भापकर, सल्लागार दिलीप पवार , मारूती जगदाळे यांनी उपथित राहुन मार्गदर्शन केले तसेच तसेव विकास करपे यांनी सुत्रसंचालन व राजेंद पाटील यांनी आभार मानले.
