Valmont स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड (Valmont Structures Private Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

इंदापूर : येथील औद्योगिक वसाहती मधील Valmont स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड (Valmont Structures Private Limited) व्यवस्थापन आणि पुना एम्प्लॉईज युनियन - युनिट इंदापूर यांच्यामध्ये दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी तिसरा ऐतिहासिक वेतन करार संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :

कराराचा कालावधी :
कराराचा कालावधी हा चार वर्षाचा राहील. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2027 

पगारवाढ :
चार वर्षासाठी सर्व कामगारांची प्रत्यक्ष वाढ 19600/- आणि एकूण अप्रत्यक्ष वाढ 20408/- रुपये एवढी झाली आहे.
पहिले वर्ष - 6475/-, दुसरे वर्ष - 5550/- तिसरे वर्षे - 3700/-, चौथे वर्ष - 2775/-, इन्सेंटिव्ह फिक्स - 1100/-
दि. 01जानेवारी 2024 पासून सर्व फरकासह पुढील महिन्यात रक्कम जमा करणार असे मान्य केले.

मेडिक्लेम पॉलिसी :
फॅमिली साठी रुपये 2.50 लाख एवढी करण्यात आलेली आहे आणि आई-वडिलांसाठी 1,00,000/- रुपये आहे तीच कंटिन्यू केली आहे

नैसर्गिक मृत्यू झाल्यास 3 CTC  किंवा 20 लाख जी रक्कम जास्त असेल ती मिळेल व अपघाती मृत्यू झाल्यास अतिरिक्त 3 CTC मिळतील

गंभीर स्वरूपाच्या आजारासाठी : कंपनी कार्पोरेट बफर मधून 250000/-आणि  अतिरिक्त खर्चासाठी मॅनेजमेंट डिस्कशन करून रक्कम मिळेल 

रात्रपाळी : भत्त्यामध्ये प्रतिदिन 20 रुपये वाढ एकूण 60 रुपये मिळेल 

हजेरी भत्ता : महिना 100 रुपये वाढ एकूण 900 रुपये मिळेल

फॅमिली फंक्शन वर्षातून एकदा होईल

कॅन्टीन मध्ये आठवड्यातून एक दिवस पनीर आणि दोन दिवस केळी वाढ केली आहे

वाढदिवसानिमित्त 300 रुपये वाढ एकूण 800 रुपये मिळतील

दसऱ्यासाठी 1/2 Kg मिक्स मिठाई आणि दिवाळीसाठी एक किलो ड्रायफूट मिळेल

     या करारासाठी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो, पुना एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष कॉम्रेड माधवराव रोहम,कॉम्रेड तानाजी खराडे, कॉम्रेड तुकाराम चौधर, कॉम्रेड अनिल रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट कार्यकारणी  अध्यक्ष - लालासो ( नाना )ननवरे, सेक्रेटरी-सचिन देवकाते, उपाध्यक्ष- जयकुमार साळुंके, खजिनदार- बुवासाहेब राऊत, सदस्य- दिपक शिंपी, सदस्य- सचिन गोपणे, सदस्य- भट्टू हुलगे यांनी कराराची बोलणी केली व व्यवस्थापनाकडून एमडी अनुप सर ,व्हॉइस प्रेसिडेंट ऑपरेशन इंडिया हेड राजू शेवाळे, व्हॉइस प्रेसिडेंट एच आर प्रसाद उत्तेकर, प्लॅन्ट हेड महावीर चौगुले, AGM HR रवींद्र चौगुले, AGM HR योगेश जोशी, AM HR महेश कांबळे यांनी करार यशस्वी होण्यासाठी सहकार्य/ बोलणी केली.