PF खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले, आता 'या' कामासाठी १ लाखांपर्यंतची रक्कम मिळणार

कर्मचारी भविष्य निधी संघटना, EPFO ने पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासंबंधीच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. पेन्शन फंड बॉडीने खातेदारांना उपचारांसाठी रक्कम काढण्याची मर्यादा वाढवली आहे. आतापर्यंत खातेदारांना, कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपयांची रक्कम काढता येत होती. आता कर्मचारी 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात.

   ईपीएफओने उपचारांसाठी पैसा काढण्याचा नियम बदलला आहे. बुधवारी 16 एप्रिल 2024 रोजी हे नियम लागू करण्यात आले आहे. या रिपोर्टनुसार, हा बदल लागू करण्यासाठी संघटनेने 10 एप्रिल रोजीच त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये संबंधित आवश्यक बदल केला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता एक लाखांपर्यंतची रक्कम काढता येईल. कर्मचाऱ्यांना नियम 68J अंतर्गत पीएफ खात्यातून रक्कम काढता येते.

गंभीर आजारात मोठी आर्थिक मदत

ईपीएफओने सेंट्रल प्रोव्हिडंट फंड कमिशनरकडून मान्यता मिळताच, हा बदल करण्यात आला. PF Account Holder ला गंभीर आजारात वा अत्यंत कठिण काळात मोठ्या रक्कमेची आवश्यकता असताना पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची सुविधा मिळते. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर कर्मचारी अग्रिम रक्कमेसाठी अर्ज करु शकतो. त्याला 1 लाख रुपयापर्यंतची रक्कम काढता येते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता मदतीसाठी कुणाकडे हात पसरावे लागणार नाही अथवा कर्ज काढण्याची वेळ येणार नाही.

कशी काढता येईल रक्कम :

  • ईपीएफओचे संकेतस्थळ www.epfindia.gov.in वर लॉगिन करा

  • त्यानंतर Online Services हा पर्याय निवडा. संबंधित क्लेम फॉर्म भरा

  • आता PF Account चे शेवटचे 4 क्रमांक टाका, पडताळणी करा

  • Proceed For Online Claim वर क्लिक कर आणि फॉर्म 31 भरा

  • तुमच्या खात्याची सविस्तर माहिती तपासा, पासबुकची सॉफ्ट कॉपी अपलोड करा

  • आता Get Aadhaar OTP वर क्लिक करा. तो अर्जात भरा आणि सबमिट करा