कॉन्फरन्सची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने झाली. याप्रसंगी व्यासपीठावर एनआयपीएम चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एम एच राजा, प्रमुख पाहुणे व एनआयपीएम चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी एनआयपीएम पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर चे चेअरमन नवनाथ सूर्यवंशी जनरल सेक्रेटरी अभय खुरसाळे सन्माननीय अतिथी प्रशांत कोरे विभागीय उपाध्यक्ष नरेंद्र पाटील राष्ट्रीय समिती सदस्य अमोल कागवाडे कॉन्फरन्स चेअरमन सतीश करंजकर राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी बस्वराजू कॉन्फरन्स समन्वयक श्रीकृष्ण गंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
चेअरमन नवनाथ सूर्यवंशी यांनी कॉन्फरन्स ची पार्श्वभूमी मांडताना राष्ट्रीय समितीने पिंपरी चिंचवड चाकण चाप्टरवर दर्शवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी समितीने केलेले अथक परिश्रम याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत उपस्थितांचे व प्रायोजकांचे आभार मानले.
राष्ट्रीय चेअरमन डॉ. एमएच राजा यांनी भव्य अशा कॉन्फरन्सच्या आयोजनाबद्दल व उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले पिंपरी चिंचवड चाकण चाप्टरचे विशेष कौतुक केले व चाप्टरच्या भावी भरीव कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.
पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर चे वैशिष्ट्य म्हणजे हे चाप्टर अतिशय तरुण म्हणून याची राष्ट्रीय स्तरावर ओळख असून अतिशय कमी वेळेत भव्य दिव्य स्वरूपाचे आयोजन केल्याबद्दल कॉन्फरन्स चे प्रमुख पाहुणे व माजी राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शन मनोगतातून पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर चे विशेष कौतुक केले.
कॉन्फरन्स चेअरमन सतीश करंजकर यांनी या कॉन्फरन्सचे आयोजन व दिवसभरातील चर्चासत्र यांच्या संदर्भात माहिती दिली. राष्ट्रीय समिती सदस्य अमोल कागवाडे यांनी पिंपरी चिंचवड चाकण चाप्टरची स्थापना व त्यामागील पार्श्वभूमी त्यांनी याप्रसंगी मांडून चाप्टरच्या भावी कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
दिवसभराच्या कॉन्फरन्स मध्ये वेगवेगळ्या विषयावरील चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते पहिले सत्र हे यशस्वी व प्रभावी एच आर एम साठी उपयुक्त धोरणे या विषयावर महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीचे सी एच आर ओ राजेश्वर त्रिपाठी यांनी उत्तम मार्गदर्शन केले. दुसरे सत्र उद्याला आज आकार देण्यासाठी एच आर नेतृत्वासाठी होणारे परिवर्तन या विषयावर संपन्न झाले या चर्चासत्राचे नेतृत्व टाटा मोटर्स स्मार्ट सिटी मोबिलिटी सोल्युशनचे एचआर प्रमुख सरफराज मनेर यांनी केले व या चर्चासत्रात मुबेआ ऑटोमोटिव्ह कंपोनंट्सचे प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर के डी सिंग व वेबसतो रूपसिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे प्रेसिडेंट व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. विकास प्रसाद यांनी सहभाग घेऊन या विषयावर सखोल रित्या चर्चा करून मार्गदर्शन केले.
डिजिटल युगात एच आर चे भवितव्य नेविगेट करणे या विषयावरील तिसऱ्या चर्चा सत्राचे नेतृत्व बी एन वाय मिलियन इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट व एच आर इन्फोटेक असोसिएशनचे मेंटॉर बळीराम मुटगेकर यांनी केले या चर्चासत्रात वेगिले सॉफ्टवेअर सोल्युशनचे को फाऊंडर व सीईओ तुषार आचार्य टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस चे एच आर जनरल मॅनेजर शेखर कांबळे एपी मोहनर चे सीएचआरओ मोहित भोसीकर तसेच राखी देशपांडे यांनी सहभाग घेतला. एच चार बिजनेस पार्टनर्स म्हणून एचआरएम च्या समस्या या विषयावरील चौथ्या चर्चा सत्राचे नेतृत्व सकाळ मीडिया ग्रुपचे सीएचआरओ विनोद बिडवाईक यांनी केले व या चर्चासत्रात भारत फोर्स लिमिटेड चे एच आर आणि आय आर चे संचालक डॉक्टर संतोष भावे पॅनासोनीक लाईफ सोल्युशन से इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आकाश सांगोळे सेफलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे व्हाईस प्रेसिडेंट एच आर शंतनू घोषाल बेसिको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इंडिया व साऊथ आफ्रिका एचआर संचालक डॉक्टर उज्वल भट्टाचार्य यांनी या चर्चासत्रात सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.
पाचवे सत्र हे इंडस्ट्रियल रिलेशन्स मध्ये गतिशील होणारे बदल या विषयावर संपन्न झाले या चर्चासत्राचे नेतृत्व इंडस्ट्रियल रिलेशन्स या विषयावरील तज्ञ महेश करंदीकर यांनी केले या चर्चासत्रात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट विजय नायर आमदार व युनियन लीडर भाई जगताप, Adv. आदित्य जोशी, केलविन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीपाद खरे यांनी या चर्चासत्रात सहभागी होऊन मार्गदर्शन केले. प्रत्येक सत्राच्या शेवटी उपस्थितांच्या शंकांचे समाधान करण्यात आले.
या कॉन्फरन्सला अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ महिंद्रा अँड महिंद्रा इगतपुरी व चाकण प्लांट हेड संजय क्षिरसागर,एन आय पी एम च्या राष्ट्रीय खजिनदार अमृता तेंडुलकर, एमआयएलएस चे सह सचिव शशांक साठे, बालाजी इन्स्टिट्यूट, एमआयटी इन्स्टिट्यूट, प्रतिभा इन्स्टिट्यूट, जेएसपीएम इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक व टीपीओ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
ही कॉन्फरन्स यशस्वी करण्यासाठी या कॉन्फरन्सचे को-चेअरमन व पुणेकर न्यूज ग्रुपचे कन्सल्टिंग एडिटर आणि जनरल अफैर्स- टीकम शेखावत तसेच एनआयपीएम. पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर चे संस्थापक अमोल कागवाडे, चेअरमन नवनाथ सूर्यवंशी, जनरल सेक्रेटरी अभय खुरसाळे, खजिनदार प्रदीप मानेकर, व्हाईस चेअरमन किशोर शिंदे, सतीश पवार, अतिरिक्त जनरल सेक्रेटरी चेतन मुसळे, एक्झिकेटीव्ही कमिटी मेंबर राहुल निंबाळकर, मधुकर सूर्यवंशी, रमेश बागल, सावित्री गोसलवाड, अर्जुन माने, शितल इंगळे, श्वेथा तसेच माजी चेअरमन तुषार टोंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले या कॉन्फरन्स मध्ये एक हजाराहून अधिक एच आर क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवून त्यांची कॉन्फरन्सला उपस्थिती लाभली कॉन्फरन्सचे सूत्रसंचालन सविथा शेट्टी यांनी केले तर उपस्थितांचे आभार अभय खुरसाळे यांनी मानले.