तळेगाव दाभाडे : येथील औद्योगिक नगरीतील शेफ्लर (ईना बेअरिंग) इंडिया लि.(Schaeffler India Limited) कंपनी व्यवस्थापन आणि शिवक्रांती कामगार संघटना युनियन यांच्यामध्ये आठवा वेतन वाढीचा करार संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
करार कालावधी : सदर करार दि.1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2026 या कालावधीसाठी लागू असेल.
सदर रक्कम एका टप्यामध्ये देण्याचे मान्य केले आहे.
फरका पोटी सर्व रक्कम देण्याचे मान्य करण्यात आली आहे.
ग्रुप इन्सेंटिव्ह : यामध्ये correction Amount 1000 रुपये प्रती महिना
अटेंडन्स अवार्ड : रु.300/- प्रति महिना
1)10 वर्षे पुर्ण रु. 50 /-
2)20 वर्षे पुर्ण रु. 100 /-
15 लोकांना प्रत्येक वर्षी 1 लाख बफर अमाउंट ठेवण्यात आली आहे . (स्वतः कामगार ,पत्नी , 2 मुले ,आई वडील)
वैद्यकीय रजा 2 ने वाढ करण्यात आली, पितृत्च रजा 7 देण्यात आल्या आहेत.
कंपनी लोन : रु.75000/- देण्याचे मान्य केले आहे.
तीन वर्षातून एकदा जर्किंग देणे मान्य केले आहे.
दिवाळीला 1 किलो काजू कतली (अमुल) देणार आहे.
मागील करारातील सर्व सेवा शर्थी व अटी आहे तशाच पुढे चालु राहतील असे उभय पक्ष्यानी मान्य केले आहे.
सदर करार यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या वतीने मा.आ.कृष्णराव भेगडे (अध्यक्ष शिवक्रांती कामगार संघटना), ॲड.विजयराव पाळेकर (सरचिटणीस), रमेश पाळेकर (चिटणीस), गुलाबराव मराठे (चिटणीस), रवींद्र साठे (खजिनदार) तसेच कंपनीच्या वतीने शंतनु घोषाल (व्हाईस प्रेसिडेंट HR/IR), सुबरोतो बॅनर्जी (प्लांट हेड), रुपेश पनंबूर (हेड एच.आर.), राजेश काजळकर सर ( मॅनेजर एच. आर. ) व स्थानिक कमिटी प्रतिनिधी प्रशांत गायकवाड (अध्यक्ष), अभिजित वाघ (जनरल सेक्रेटरी), विजय कुडले (उपाध्यक्ष), संदिप धायगुडे (सहसेक्रेटरी), रमेश चोरमले(खजिनदार), संदिप पेटकर(सह खजिनदार), प्रविण पवार(सदस्य), श्रीकांत पाटील(सदस्य) यांनी काम पाहिले.