मायलॅन कंपनी (Mylan Company) येथे वेतनवाढ करार संपन्न

सातपूर : फार्मा क्षेत्रातील आघाडीच्या मायलॅन कंपनीत १९ हजार ६६६ रुपयांचा पगारवाढीचा करार करण्यात आला. उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या पगारवाढीचा हा करार असल्याचे कामगार वर्गात बोलले जात आहे. 

   गेल्या काही वर्षांत हॉस्पिटल, मेडिकल म्हणजेच फार्मा क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहे. यात मायलॅन कंपनीनेही आपला विस्तार करत वेगळी उंची गाठली आहे. नुकताच त्यांचा सहाय्यक कामगार आयुक्त शर्वरी पोटे यांच्या दालनात कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक ओएसडी हेड प्रमोदकुमार सिंग, कॉर्पोरेट हेड (एच. आर.) डॉ. एन. एम. राव, व्हाइस प्रेसिडेंट (एच. आर.) जितेंद्र खैरे, जी. एम. (एच.आर.) प्रशांत संगमनेरकर, प्लॅन्ट हेड मनोज जैन, उदय कचवेकर, कामगार युनियनचे अध्यक्ष सुभाष मोरे, उपाध्यक्ष कमानकर, जनरल सेक्रेटरी किरण गोजरे, रवींद्र देशमुख, महेश पवार, राजेंद्र प्रभुणे यांच्यातसकारात्मक वातावरणात हा करार करण्यात आला.

    या कराराचे वैशिष्ट्ये म्हणजे हा करार १ ऑगस्ट २०२३ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत राहणार आहे. कंपनी व युनियनचा हा सहावा करार असून, त्यात रु. १९ हजार ६६६ रुपयाची घसघशीत वाढ झाल्याने जुन्या कामगारांना ९० हजार ते नवीन कायम झालेल्या कामगार किमान ५५ हजार रुपये पगार मिळणार आहे. तसेच सेवेला दहा वर्षे पूर्ण झाले असतील, तर त्या कामगाराला दोन लाखांची, २० वर्षे सेवा पाच लाख, २५ वर्षांपुढील सेवा सहा लाखांचे अधिक अनुदान मिळणार आहे.

"मायलॅन कंपनी व्यवस्थापक व कामगार युनियन यांच्यात सकारात्मक वातावरणात पगारवाढीचा करार झाला. त्यात कंपनी व्यवस्थापनाने अनेक चांगल्या गोष्टीचा समावेश करून कामगार हिताचा निर्णय घेतला आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे."
- शर्वरी पोटे, सहाय्यक आयुक्त (कामगार)