ऑर्लिकॉन फ्रिक्शन सिस्टम कंपनी कामगारांना मिळाली नुकसान भरपाई

पुणे : सणसवाडी येथील ऑर्लिकॉन फ्रिक्शन सिस्टम इंडिया.प्रा. ली .च्या व्यवस्थापनाने ८/०१/२०२४ रोजी अचानक कंपनी बंद ची नोटीस देऊन कंपनी बंद केली.  सदर कंपनी मधे ३६ कामगार आहेत.क्लोजर कारवाई विरोधात कामगार कंपनी गेटवर धरणे आंदोलन करत होते . सदर क्लोजर अन्यायकारक असल्याची तक्रार सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे युनियनने केली होती. 

    ५० पेक्षा कमी कामगार असल्याने कायद्याचे संरक्षण नसताना सुद्धा सहाय्यक कामगार आयुक्त दत्ता पवार यांनी सदर प्रकरणी जलद कार्यवाही करून तोडगा काढण्याचे प्रयत्न केले. सदर प्रकरणी पाच बैठका होऊन अखेर दि. २३/०२/२०२४ रोजी व्यवस्थापन व युनियन यांच्यामध्ये सामंजस्य होऊन एकूण ३६ कामगारांना नुकसान भरपाई म्हणून सरसकट प्रत्येकी ६ लाख रू. भरपाई देण्याचे उभयपक्षामध्ये मान्य झाले. सदर रक्कम दि ७ मार्च पर्यंत कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती युनियन यांनी दिली.

  यावेळी युनियनच्या वतीने सहायक आयुक्त दत्ता पवार,  कंपनी व्यवस्थापन श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारुती जगदाळे तसेच अध्यक्ष व जनरल सेक्रेटरी, सर्व पधाधिकारी, सर्व कामगार बंधू व महासंघास संलग्न असणाऱ्या सर्व संघटना यांचे आभार मानले.