कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) नियमांमध्ये मोठे बदल करून निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. याअंतर्गत आता त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही वैद्यकीय सेवेचा लाभ मिळणार आहे, जे जास्त वेतन मर्यादेमुळे ईएसआय योजनेतून बाहेर पडले होते. नुकत्याच झालेल्या ईएसआयसीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
नव्या नियमानुसार कोणाला मिळणार लाभ ?
1 एप्रिल 2012 नंतर किमान पाच वर्षे ईएसआय योजनेअंतर्गत रोजगारात असलेल्या आणि 1 एप्रिल 2017 रोजी किंवा त्यानंतर दरमहा 30,000 रुपयांपर्यंत वेतनासह सेवानिवृत्त झालेल्या किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. अशा कर्मचाऱ्यांना नव्या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सध्याचे नियम काय आहेत ?
ईएसआय योजनेचा लाभ अशा कर्मचाऱ्यांना मिळतो ज्यांचे मासिक उत्पन्न २१ हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे. तर, शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी किमान वेतन मर्यादा 25,000 रुपये आहे. या योजनेत कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही योगदान देतात.

असा होणार फायदा
सेवानिवृत्त कर्मचारी आणि कायमस्वरूपी अपंग विमाधारक व्यक्ती आणि त्यांच्या पती-पत्नींना १२० रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर वैद्यकीय सेवा मिळणार आहे. विमाधारक व्यक्तीच्या उपचारावरील खर्चावर कमाल मर्यादा नाही.

देशभरातील १५० हून अधिक रुग्णालये
या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना ईएसआय कार्ड दिले जाते. कर्मचाऱ्यांना ईएसआय दवाखाना किंवा रुग्णालयात मोफत उपचार मिळू शकतात. देशभरात १५० हून अधिक ईएसआयसी रुग्णालये आहेत, जिथे सामान्य ते गंभीर आजारांवर उपचारसुविधा उपलब्ध आहेत.

आयुष 2023 पॉलिसी देखील लागू असेल
या बैठकीत ईएसआय अंतर्गत समाविष्ट असलेल्या लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आयुष 2023 धोरण आणण्याचा निर्णय घेण्यात आला. हे धोरण सर्व ईएसआयसी केंद्रांवर लागू करण्यात येणार आहे. याअंतर्गत ईएसआयसी रुग्णालयांमध्ये पंचकर्म, क्षारसूत्र आणि आयुष युनिट सुरू करण्यात येणार आहेत.