जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना बेमुदत संप

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी  जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी १४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. 

    राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सचिव अविनाश दौंड यांनी माहिती देताना सांगितले की जुनी पेन्शन मिळावी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, सर्व रिक्त भरावीत, शिक्षणाचे खाजगीकरण  थांबवावे आदी प्रमुख मागण्यांसाठी मार्च २०२३ मध्ये ७ दिवसांचा संप केला होता. संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सात महिने उलटून सुद्धा ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.  मागण्यांकडे शासनाने संपुर्ण दुर्लक्ष केल्याने  संतप्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार पुन्हा बेमुदत संप पुकारला आहे अशी माहिती अविनाश दौंड यांनी दिली.

    या संपात राज्यातील १७ लक्ष सरकारी निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दिनांक १७ लक्ष कर्मचारी संपावर जाणार आहेत अशी माहिती संघटना अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी दिली आहे. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील असेही मिलिंद सरदेशमुख यांनी सांगितले आहे.