पिरंगुट : पिरंगुट (ता. मुळशी) येथील औद्योगिक वसाहतीमधील मुबीया आटोमोटिव्ह कॉम्पोनंट्स इं.प्रा.लि.कंपनी च्या वतीने कर्मचाऱ्यांना दिवाळीचा रुपये 29000/- बोनस देण्यात आला असून आतापर्यंत कंपनीच्या 22 वर्षांच्या इतिहासामधील सर्वाधिक विक्रमी रक्कम देण्यात आली आहे. ही बोनसची रक्कम जाहीर होतात सर्व कामगारांच्या वतीने फटाके फोडून आपला आनंद साजरा करण्यात आला
दिवाळी बोनस मिळावा यासाठी मुबिया व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यामध्ये देण्यात येणाऱ्या रकमेबाबत चर्चेच्या अनेक सकारात्मक फेऱ्या झाल्या.त्यानंतर मुबिया व्यस्थापनाने सर्व कर्मचाऱ्यांबाबत चांगला व सकारात्मक निर्णय घेऊन रुपये 29000/- बोनस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.त्यामुळे येथील सर्व कामगार वर्गामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
मुबिया कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी के. डी. सिंग यांनी आपल्या नेतृत्वाखाली या कंपनीच्या गुणवत्तेमध्ये कमालीची वाढ केलेली आहे. त्यामुळेच कंपनीच्या 22 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी गुणवत्ता ही वाढलेली आहे.या वाढलेल्या गुणवत्तेमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचा मोठा सिंहाचा वाटा असल्यानेच आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना हि विक्रमी बोनस ची मोठी रक्कम देत असल्याचे व्यवस्थापकीय अधिकारी के.डी. सिंग यांनी सांगितले.
यावेळी मुबिया कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी के.डी.सिंग यांच्यासह मुबिया इंडिया एच.आर.हेड रमण गोवित्रीकर प्लेट मेनेजर दुसान,प्रोडक्शन मॅनेजर अविनाश दिवाण एच.आर.डेप्युटी मॅनेजर अतुल पिसाळ,मुबिया युनियनचे अध्यक्ष किरण नागरे,जनरल सेक्रेटरी रामदास निवंगुणे,हनुमंत नांगरे, सागर बराटे,कालिदास नगरे उपस्थित होते.