कॉन्सेंट्रीक पंप्स पुणे प्रायव्हेट लिमिटेड (Concentric Pumps Pune Private Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : लोणीकंद येथील कॉन्सेंट्रीक पंप्स पुणे प्रायव्हेट लिमिटेड (Concentric Pumps Pune Private Limited) कंपनी व्यवस्थापन आणि कॉन्सेंट्रीक कामगार संघ  यांच्या मध्ये दिनांक १७/१०/२०२३ रोजी तिसरा ऐतिहासिक वेतनवाढ करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्टये खालील प्रमाणे -

करार कालावधी : कराराचा कालावधी हा ३ वर्षाचा असेल १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२६ 

पगारवाढ : तीन वर्षासाठी सर्व कामगारांची वेतनवाढ एकूण १५,०००/- रूपयांनी झालेली आहे . 
प्रथम वर्ष - ७५०० (५०%)
दुसरे वर्ष.  -३७५० (२५%)
तिसरे वर्ष- ३७५० (२५%)
प्रमाणे असेल.
      कराराचा फायदा हा दि. ०१ एप्रिल २०२३ पासून झालेली वेतनवाढ आणि वेतनवाढ होण्यासाठी लागणाऱ्या कालावधीतील फरक हा सर्व कायमस्वरूपी कामगारांना देण्यात येईल, तसेच वेतनवाढ करार हा CTC based असेल.

कामगारांचा आरोग्य विमा : सध्या सुरू असलेल्या एक लाख रक्कमेच्या आरोग्य विम्यामध्ये वाढ करून तो दोन लाख रुपये एवढा करण्यात आला आणि कार्पोरेट बफर पोलिसी पूर्वीप्रमाणेच पाच लाख रुपये असेल त्या आरोग्य विम्यामध्ये कामगारांचे कुटूंब म्हणजे स्वतः, पत्नी, आई वडील आणि दोन मुले असा समावेश असेल तसेच तो पूर्णपणे निशुल्क असेल. त्याचप्रमाणे पूर्वी सुरू असलेली पाच टक्के CO-PAY पद्धत बंद करण्यात आली.

टर्म इन्शुरन्स :  सध्या सुरू असलेल्या ७ लाख वरून १५ लाख रुपये टर्म इन्शुरन्स देण्याचे व्यवस्थापनाकडून  मान्य केले आहे.

मेडिकल टेस्ट : सध्या सुरू असलेल्या वार्षिक हेल्थ चेक अप मध्ये वाढ करून एसीजी चेकअप केले जाईल त्याचप्रमाणे मेडिकल चेकअप मध्ये काही प्रॉब्लेम आल्यास सिटीस्कॅन एमआरआय करण्याची गरज भासल्यास त्याचा खर्च देखील करण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले.

रजा : सध्या देण्यात येणाऱ्या ३० दिवस (PL- १५, SL- ९, CL- ६ ) रजेमध्ये १ ने वाढ करून त्या ३१ दिवस करण्याचे मान्य केले. (PL- १५, SL १०, CL ६ ) हक्काच्या रजेची (PL) साठवणूक क्षमता ३० रजेवरून ४५ रजा अशी करण्यात आली.
  सध्या सुरू असणाऱ्या पगारी सुट्ट्यांमध्ये एक ने वाढ करून ८ ऐवजी ९ सुट्या  सुट्टी देण्याचे ठरले सदर वाढलेली सुट्टी १ जानेवरी ला दिली जाईल त्याचप्रमाणे पगारी सुट्टी रविवारी आली तर ती दिवाळीमध्ये दिली जाईल.

सॅलरी अँडव्हान्स : सॅलरी अँडव्हान्स सध्या असलेल्या प्रथेप्रमाणे दोन पगार परंतू ती रक्कम 15 हफ्त्यांमध्ये कपात होईल जे सध्या आठ हफ्त्या मध्ये आहे.

दिर्घसेवा पुरस्कार: दिर्घसेवा पुरस्कार, 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्षासाठी रुपये 10 हजारांपर्यंतची भेट वस्तू देण्यात येईल आणि सोबत ट्रॉफी देखील दिली जाईल.

कॅन्टीन सुविधा : कँटीनमधील जेवणाची गुणवत्ता सुधारण्याचे मान्य केले. 1 st आणि 2nd शिफ्टमध्ये सर्व कामगारांना आठवड्यामध्ये एका आठवड्यात अंडा करी आणि दुसऱ्या आठवड्यात चिकन मसाला देण्याचे मान्य केले त्याचप्रमाणे 3 rd शिफ्ट मध्ये घरी जाताना नाश्ता देण्याचे मान्य करण्यात आले.

जुना वेतनकरार : मागील वेतन करारातील चालू सोयी सुविधा म्हणजेच या करारात उल्लेख नसलेल्या व सध्या अस्तित्वात असलेल्या इतर सर्व सोयी-सुविधा यापुढेही त्याच नियम आणि अटी आहे तशाच चालु राहतील. 

    सदर करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी कंपनी व्यवस्थापना कडून संजय डबीर (Managing Director)  रामेंद्र मलथियार (HR Director) विजय हेकडे (Genral Manager) रमेश बागल(HR/IR) चेतन पोमजी (Process Head) युनियन तर्फे अध्यक्ष विजय कुलकर्णी, उपाध्यक्ष सचिन गुंडाळ, जनरल सेक्रटरी राहुल धावारे, जॉइंट सेक्रेटरी अमित प-हाड, खजिनदार शहाजी भंडारे, का.सदस्य सचिन सावंत आणि जोतिबा गाडीवड्ड उपस्थीत होते. 

    वेतन करार यशस्वीरिता संपन्न होण्यासाठी अतिमोलाचे मार्गदर्शन पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप दादा विद्याधर कंद आणि श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारुती जगदाळे, अरविंद श्रौती, दिलिप पवार, किशोर सोमवंशी, मनोज पाटिल, रोहित पवार, तसेच श्रमिक एकता महासंघाचे सर्व प्रतिनिधी यांनी केले तसेच सर्व कामगार सभासद आणि व्यवस्थापनाच्या मोलाचे सहकार्य लाभले.