पुणे : रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड (Fiat India Automobile Private Limited) कंपनी व्यवस्थापन आणि फियाट एम्प्लॉईज युनियन यांच्या मध्ये दिनांक २७/०९/२०२३ रोजी चौथा ऐतिहासिक वेतनवाढ करार संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्टये खालील प्रमाणे -
करार कालावधी : कराराचा कालावधी हा ४ वर्षाचा असेल १ जुलै २०२२ ते ३० जून २०२६
प्रथम वर्ष - ७०%, दुसरे वर्ष - १०%, तिसरे वर्ष- १०%, चौथे वर्ष - १०%
कराराचा फायदा हा दि. ०१ जुलै २०२२ पासून झालेली वेतनवाढ आणि वेतनवाढ होण्यासाठी लागणाऱ्या कालावधीतील फरक हा सर्व कायमस्वरूपी कामगारांना देण्यात येईल, तसेच वेतनवाढ करार हा CTC based असेल.
कामगारांचा आरोग्य विमा : सध्या सुरू असलेल्या एक लाख रक्कमेच्या आरोग्य विम्यामध्ये वाढ करून तो ३ लाख रुपये एवढा करण्यात आला आणि त्या आरोग्य विम्यामध्ये कामगारांचे कुटूंब म्हणजे स्वतः, पत्नी, आणि दोन मुले असा समावेश असेल तसेच तो पूर्णपणे निशुल्क असेल.
आई आणि वडील यांचा आरोग्य विमा : सध्या सुरु असलेल्या एक लाख रक्कमेच्या आरोग्य विम्यामध्ये वाढ करून तो ३ लाख रुपये एवढा करण्यात आला आणि त्या आरोग्य विम्याचा प्रीमियम हा पूर्णपणे एम्प्लॉयी भरतील असे मान्य करण्यात आले.
टर्म इन्शुरन्स : सध्या सुरु असलेल्या १५ लाख रुपये टर्म इन्शुरन्समध्ये वाढ करून तो २५ लाख रुपये करण्यात आला तसेच इन्शुरन्सचा प्रीमियम हा ५०% व्यवस्थापन आणि ५०% एम्प्लॉयी भरतील असे मान्य करण्यात आले.
रजा : सध्या देण्यात येणाऱ्या ३३ दिवस (PL- २०, SL- ७, CL- ६ ) रजेमध्ये १ ने वाढ करून त्या ३४ दिवस करण्याचे मान्य केले. (PL- २०, SL ८, CL ६ ) हक्काच्या रजेची (PL) साठवणूक क्षमता ६० रजेवरून ७० रजा अशी करण्यात आली.
शिक्षणासाठी ऍडव्हान्स सॅलरी : सर्व कायम कामगार व कामगाराच्या कुंटुंबातील मुलामुलींच्या तात्काळ ऍडव्हान्स सॅलरी देण्याचे मान्य केले व ते समान हप्त्यातून कापून सुविधा घेण्याचे मान्य केले.
कँटीन सुविधा : कँटीनमधील जेवणाची गुणवत्ता सुधारण्याचे मान्य केले. A आणि B शिफ्टमध्ये सर्व कामगारांना आठवड्यामध्ये एकवेळ अंडा करी आणि एकवेळ अंडा मसाला देण्याचे मान्य केले. A आणि B शिफ्टमध्ये सर्व कामगारांना आठवड्यामध्ये दोन वेळा २०० मिली दुध देण्याचे मान्य केले. C शिफ्टमधील सर्व कामगारांना पुर्ण आठवड्यामध्ये दररोज २०० मिली दुध देण्याचे मान्य केले. कॅटीन मधील सुविद्धतेबद्दल वाढीव cutting २५० रुपये देण्याचे युनियनने मान्य केले.
मंचर रूट साठी नवीन बस सेवा देण्याचे मान्य केले. ट्रान्सपोर्ट सुविद्धतेबद्दल वाढीव cutting १०० रुपये शॉर्ट रूटसाठी आणि २०० रुपये लॉन्ग रूट साठी देण्याचे युनियनने मान्य केले.
युनिफॉर्म (गणवेश) सुविधा : सध्या मिळणाऱ्या युनिफॉर्म मध्ये ३ शर्ट ऐवजी २ शर्ट आणि १ टी शर्ट देण्याचे मान्य केले ( २ शर्ट, १ टी शर्ट आणि २ पॅन्ट ), ATM कामगारांना मिळणारे सेफ्टी शूज हे उच्च प्रतीचे आणि वजनाने हालके देण्याचे मान्य केले.
Sunday Working Allowance : Weekly ऑफच्या दिवशी जर कामगारांना कामावर बोलवायचे असेल तर त्याना एक ऑफ आणि ३०० रुपये भत्ता देण्याचे मान्य केले.
outstation working पॉलिसी : सध्या असणाऱ्या outstation working पॉलिसीमध्ये सुधारणा करून सर्व भत्त्यांमध्ये वाढ करण्याचे मान्य केले.
C - शिफ्ट मधील वेळेतील बदल : A आणि B या शिफ्ट मधील कामाच्या वेळेत किंवा इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. C शिफ्ट मध्ये आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शिफ्ट संपण्याचे टाईमिंग हे ७.४५ am होते (आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ७० मिनिटे जास्त वेळ काम करावे लागत होते) त्याऐवजी त्यामध्ये बदल करून ते टाईमिंग हे ६.४५ am केले आणि सदर शिफ्ट मधील वेळेमध्ये समतोल साधण्यासाठी नाष्टयाच्या वेळतील ५ मिनिटे कमी केली म्हणजेच १५ | मिनिट ऐवजी १० मिनिट नाष्टयाची वेळ असेल आणि इतर दिवशी C शिफ्ट हि पूर्वीच्या वेळेतच म्हणजे शिफ्ट संपण्याचे टाईमिंग हे ६.३५ am असेल
VPS स्कीम : सध्या आस्तित्वात असणाऱ्या VPS स्कीम मधील त्रुटी टाळून नवीन सकारात्मक VPS स्कीम तयार केली त्यामुळे CAR division मधील कामगारांचे पूर्वी होणारे नुकसान कमी होण्यास मदत होईल. Safety, Quality, Delivery आणि Cost मधे एक ठराविक ध्येय गाठल्यानंतर Motivational रक्कम म्हणून आगाऊ २०% रक्कम देण्यात येईल. एकूण प्रत्यक्ष CTC च्या २५% VPS देण्याचे युनियनने मान्य करून सदर स्कीमधील ५०% रक्कम हि फिक्स करण्यात आली. सदर VPS स्कीमचा एक भाग म्हणून कामगारांच्या हजेरीनुसार Attendance Bonus स्वरूपात रक्कम देण्यात येईल.
जुना वेतनकरार : मागील वेतन करारातील चालू सोयी सुविधा म्हणजेच या करारात उल्लेख नसलेल्या व सध्या अस्तित्वात असलेल्या इतर सर्व सोयी-सुविधा यापुढेही त्याच नियम आणि अटी आहे तशाच चालु राहतील.
सदर करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी कंपनी व्यवस्थापना कडून राजेश खत्री (President & CEO), पंकज प्रदीप ( HR हेड ), मिलिंद काळे (IR हेड) तसेच पंकज गर्ग, नवीन जोशी,आशिष शर्मा, राजेंद्र शेखाडे तसेच युनियन तर्फे अध्यक्ष विलास ढोमसे, जनरल सेक्रेटरी सागर भोसले, कार्याध्यक्ष नितीन शिंदे, खजिनदार मल्हारी थोरात, उपाध्यक्ष पंकज फाळके, प्रवीण कदम, सह-सेक्रेटरी सागर येणारे, हनुमंत चोपडे, सदस्य ओमप्रकाश जाधव, अनिल मरकड, दत्तात्रय मोरे उपस्थीत होते. वेतन करार यशस्वीरिता संपन्न होण्यासाठी सर्व कामगार सभासद आणि व्यवस्थापनाच्या मोलाचे सहकार्य लाभले.