ब्रिंटन्स कार्पेट्स एशिया प्रायव्हेट लिमिटेड (Brintons Carpets Asia Pvt Ltd) येथे वेतनकरार संपन्न

मुळशी : येथील औदयोगिक वसाहती मधील ब्रिंटन्स कार्पेट्स एशिया प्रायव्हेट लिमिटेड (Brintons Carpets Asia Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि  ब्रिंटन्स कार्पेट्स कामगार युनियन  यांच्या मध्ये दिनांक ४ ऑगस्ट २०२३  रोजी सहावा वेतनकरार संपन्न झाला आहे. सदर वेतन करार हा व्यवस्थापन व युनियन यांच्या सामंजस्यामुळे फक्त ७ दिवसांमध्ये संपुष्टात आला.

कराराची ठळक वैशिष्टये खालील प्रमाणे -

कराराचा कालावधी : सदर करार तीन वर्षांसाठी असुन कराराचा कालावधी दिनांक १ ऑगस्ट २०२३ ते ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत असेल.

पगारवाढ : तीन वर्षासाठी सर्व कामगारांची वेतनवाढ एकूण १०,५००/- रूपयांनी झालेली आहे . 
पहिल्या वर्षी -  रक्कम एकूण ५००० रु. 
दुसऱ्या वर्षी -  रक्कम एकूण ३००० रू. 
तिसऱ्या वर्षी -  रक्कम एकूण २५०० रू. 
एकूण पगार : सदर पगारवाढ झाल्यानंतर कायमस्वरूपी कामगारांचा एकूण पगार कमीत कमी ७४,४००/- रू . व जास्तीत जास्त पगार ७९,०००/- रू. झालेला आहे. 
सदर पगारवाढीचा फायदा संघटनेच्या एकूण २५५ कायमस्वरूपी कामगारांना झालेला आहे.

महागाई भत्ता : महागाई भत्ताच्या सध्याच्या रक्कमे मध्ये दर सहा महिन्याला २००/- रुपये मिळवून अदा केले जातील.

रजा : कर्मचाऱ्यांच्या मागील वर्षातील हजेरीवर आधारित पगारी रजांमध्ये २ दिवसाची पगारी रजा वाढवण्यात आली आहे.

नाईट शिफ्ट भत्ता :  सध्या मिळणारा नाईट शिफ्ट भत्ता ६००/- रुपये असून त्यामध्ये ४००/- रुपयांनी वाढ करून १०००/- रुपये करण्यात आला आहे.

हजेरी बोनस : महिन्यातील सर्व कामकाजांच्या दिवशी १००% प्रत्यक्ष उपस्थिती असल्यास ५००/- रुपये हजेरी बोनस लागू असेल.

रविवार भत्ता : रविवार व साप्ताहिक सुट्टी च्या दिवशी प्रत्यक्ष कामावर उपस्थित राहणाऱ्या कामगारास प्रत्येक रविवारी व साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाबद्दल मिळणारा भत्ता १००/- रु वरून १५०/- रु करण्यात आला आहे.

कौशल्य भत्ता : मेंटेनन्स व साईट इंजिनिअरिंग विभागातील उच्च कुशल कामगारांना मिळणारा कौशल्य भत्ता ५००/- रुपये वरून वाढवून ७५०/- रुपये करण्यात आला आहे.

फेटलिंग अलाउन्स : कंपनीतील पेटलर्स ना दरमहा ५००/- रुपये फेट्लिंग अनाउन्स देण्यात येईल.

स्पेशल लिव्ह बँक : कर्मचाऱ्यांना त्यांच्या गंभीर आजारांसाठी जास्तीत जास्त रजांची आवश्यकता भासत असल्यामुळे व्यवस्थापन व युनियन यांनी एकमताने एक खास रजा स्पेशल लिव्ह बँक उघडली आहे. या लिव्ह बँकेमध्ये वर्षासाठी ३०० रजा व्यवस्थापन जमा करेल व युनियन प्रतिनिधी व  एच. आर. मॅनेजर यांच्या संमतीने ज्या कर्मचाऱ्यांना गंभीर आजारांसाठी रजांची गरज आहे अशा कर्मचाऱ्यांना त्यातून ३० दिवसापर्यंत रजा मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.

बोनस / एक्स-ग्राशिया पेमेंट :  बोनस रक्कम ही  Basic + DA च्या 20% देण्यात येईल.
एक्स-ग्राशिया रक्कम दर साल रुपये २२००/- ते ७०००/- (Link to Production) पर्यंत देण्यात येईल.
बोनस सोबत भेटवस्तू देण्याऐवजी १६००/- रुपये थेट रक्कम बोनस आणि एक्स-ग्राशिया रक्कमे सोबत देण्यात येईल.

दिवाळी/ दसरा पूजा : प्रतिवर्षी खंडे नवमीला दसरा पूजा यासाठी १/२ किलो मिठाई पुडा व दिवाळीमध्ये १ किलो मिठाईचा पुडा देण्यात येईल.

मेडिकल पॉलिसी GMC : कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय (आई-वडिलांसह) यांच्यासाठी सध्या मिळत असलेला असलेला मेडिकल पॉलिसीची रक्कम ७५,०००/- वरून वाढवून १,००,०००/- रुपये करण्यात आली आहे.

२४ तास अपघाती विमा  GPA : कोणत्याही कामगारास कंपनीत काम करत असताना  झालेल्या अपघातामुळे अपंगत्व व मृत्यू झाल्यास मृत्यू भरपाई दाखला १००,०००/- रुपयापर्यंत ची रक्कम देण्यात येईल.

डेथ रिलीफ फंड : कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या कंपनीच्या नोकरी काळात दुर्दैवी मृत्यू ओढवल्यास मरणोत्तर सानुग्रह रक्कम ५,००,०००/- रुपये कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल.

     सदर वेतनकरारावर सुजित शिर्के (असिस्टंट लेबर कमिशनर पुणे) व्यवस्थापना कडून प्रकाश बसंनावर (मॅनेजिंग डायरेक्टर),  सतीश करंजकर (एच आर मॅनेजर), समीर कोलते (प्रॉडक्शन मॅनेजर), योगेश शिंदे (मेंटेनन्स मॅनेजर), निखिल माळवदे, निलेश गोंदकर, जयेश जगताप, योगेश चौगुले, रोहित सपकाळ, श्रुती भुयार तसेच संघटनेकडून मनोहर तापकीर (अध्यक्ष), निलेश गाडे (जनरल सेकेटरी), अमित नागरे (खजिनदार) तसेच सह सदस्य -  निलेश गोडांबे, अशोक जोरी, योगेश वाघ, रवींद्र वनवे, रमेश येरगोप्पा, वीरेंद्र ठाकूर, सुजित देवकर व संतोष शेडगे यांच्यावतीने स्वाक्षरी करण्यात आली.