जे एफ ई सोजी स्टील इंडिया प्रा. लि. (JFE Shoji Steel India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

रांजणगाव : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील जे एफ ई सोजी स्टील इंडिया प्रा. लि. (JFE Shoji Steel India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि जे एफ ई शोजी स्टील इंडिया कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.

कराराची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :

करार कालावधी : एप्रिल २०२३ ते मार्च २०२६ या तीन वर्षासाठी लागू राहील.

पगारवाढ : रु.१७,०००/- इतकी प्रत्यक्ष वाढ करण्यात आली.
पहिल्या वर्षी : रु.८०००/-
दुसऱ्या वर्षी : रु.४५००/-
तिसऱ्या वर्षी : रु.४५००/-
     या सतरा हजार पगार वाढीच्या 80% रक्कम मूळ पगारामध्ये समाविष्ट करण्याचे मान्य झालेले आहे. तसेच मार्च २०२६ पासून कामगाराच्या एकून मुळ वेतनावर १२% इतका भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करण्याचे मान्य झाले असून व तेवढाच हिस्सा व्यवस्थापनाने देण्याचे मान्य केले आहे. सध्या मूळ पगार कमीत कमी रु.२५,०००/- ते रु.४०,०००/- इतका आहे.

बोनस : दरवर्षी दिवाळीमध्ये रु.२५,०००/- इतका फिक्स बोनस मिळणार असून पुढे सलग तीन वर्षे रु.२५,०००/- याप्रमाणे बोनस मिळणार आहे.

गणवेश : दरवर्षी प्रत्येक कर्मचाऱ्यास चांगल्या प्रतीच्या नवीन कापडाचे चार गणवेश देण्याचे मान्य झाले आहे.

मेडिक्लेम : प्रत्येक कामगारांची पाच लाख पर्यंतची मेडिक्लेम पॉलिसी देण्याचे मान्य केले आहे. 

स्नेह संमेलन : दरवर्षी गेट टू गेदर कंपनीच्या वतीने आयोजित करण्याचे ठरलेले आहे.

दीर्घ कालीन सेवा पुरस्कार :
ज्या कामगारांची नोकरी १० वर्ष झाली अशा कामगारांना रु.१०,०००/-
ज्या कामगारांची नोकरी १५ वर्ष झाली अशा कामगारांना रु.१५,०००/-
ज्या कामगारांची नोकरी २० वर्ष झाली अशा कामगारांना रु.२०,०००/-
ज्या कामगारांची नोकरी २५  वर्ष झाली अशा कामगारांना रु.२५,०००/-
हा पुरस्कार एकदाच मिळणार आहे.

    या करारावर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मित्सुताका यामासाकी व एच आर मॅनेजर कादिर शेख तसेच जे एफ ई शोजी स्टील इंडिया कामगार संघटना मार्फत कामगार नेते रामचंद्र बी शरमाळे, संघटनेचे अध्यक्ष अजित चौधरी, योगेश राजगुरु, रविंद्र फाळके, शरद बनकर, जहीर शेख, गोवर्धन मावळे, विवेक कांबळे व सुहास जोशी यांनी युनियनचे पदाधिकारी म्हणून दि. १२/८/२०२३ रोजी करारावर सह्या केल्या.

     या कराराच्या आनंदत्सोवा निमित्त कंपनीच्या गेट समोर फटाके वाजवून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यात कामगार व व्यवस्थापन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या भरघोस पगारवाढी मुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.