शिरवळ : रिएटर इंडिया कंपनीचे मुजोर अधिकारी किरण कटारिया यांच्यापासून आपल्या यजमानावर होत असलेल्या अन्याय, अत्याचार विरुद्ध कंपनीतील 355 कामगारांनी पुकारलेल्या संपात उपस्थित सर्व महिलांनी आपले अश्रू गाळत पाठिंबा दिला.
रविवारी दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी बळीराजा मंगल कार्यालय येथे आयोजित मेळाव्यात सर्व संपावर असलेल्या कामगारांच्या धर्मपत्नींनी हजेरी लावून संपाचे समर्थन करून कामगारांना नाहक, सतत त्रास देऊन छळ करणाऱ्या मुजोर अहंकारी व विकृत प्रवृत्तीच्या किरण कटारिया याचा तीव्र निषेध करण्यात आला अनेक महिलांनी किरण कटारियाच्या पापाचा पाढा आपल्या मनोगतामधून व्यक्त केला तसेच मागण्या मान्य होईपर्यंत संप व आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार सभेमध्ये महिलांनी व्यक्त केला.
श्रमिक एकता महासंघाचे प्रमुख सल्लागार मारुतीराव जगदाळे, अध्यक्ष किशोर सोमवंशी, जनरल सेक्रेटरी रोहित पवार, सल्लागार दिलीप पवार, श्रमिक एकता महासंघाचे महिला अध्यक्ष सौ विद्याताई तांबे, कार्याध्यक्ष विकास करपे, सदानंद टिळेकर, संतोष कणसे यांनी सभेत महिलांना व कामगारांना मार्गदर्शन केले.
तसेच रिएटर इंडिया (शिरवळ) कंपनीतील HR हेड किरण कटारिया यांच्याकडून कामगारांवर होत असलेल्या अन्याय अत्याचारा विरुद्ध कामगारांच्या माता भगिनी, अर्धांगिनी यांनी मस्तवाल, विकृत कटारियाच्या विरुद्ध पोलिसात तक्रारी दाखल करून नारीशक्तीने आता रिअटर इंडियाच्या किरण कटारिया विरुद्ध चालू असलेल्या संघर्षामध्ये उडी घेतली आहे अशी माहिती श्रमिक एकता महासंघ यांच्याद्वारे देण्यात आली.