तळेगांव - हिंजवडी : तळेगांव-हिंजवडी MIDC फेज २ मधील एमरसन प्रोसेस मॅनेजमेंट (इंडिया) प्रायवेट लिमिटेड (Emerson Process Management India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि एमरसन एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये मंगळवार दिनांक 0८/0८/२०२३ रोजी सहावा त्रैवार्षिक वेतनवाढ करार संपन्न झाला.
कराराची वैशिष्ट्ये खलील प्रमाणे :
पहिल्या वर्षी : रु.११५००/-
दुसऱ्या वर्षी : रु.५००/-
तिसऱ्या वर्षी : रु.५००/-
करार कालावधी : तीन वर्षे दि.०१/०४/२०२२ ते दि.३१/०३/२०२५
कामगारंच्या कुटुंबातील व्यक्तीस रु. ३००००० ( तीन लाख ) पॉलिसी संपूर्ण हप्ता कंपनी भरणार या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, आणि तीन मुले यांचा समावेश आहे.
कंपनीच्या सेवेमध्ये असणारे कामगारांस पुणे राहणीमान निर्देशंकाच्या अंकाच्या प्रतिदिन प्रतिअंकास ०.१२ पैसे या दराने बदलता महागाई भत्ता मिळण्यास पात्र राहतील.
एल टी ए : प्रतिवर्ष BASIC + DA + VDA च्या 8.33% इतका देण्यात येईल.
रात्रपाळी भत्ता : रात्रपाळी भत्ता प्रतिदिन रु.५५/- देण्यात येईल.
बस सुविधा : सर्व कामगारांना बस सुविधा उपलब्ध राहील तसेच बससुविधेपोटी दरमहा रु.४००/- कपात करण्यात येईल.
गणवेषाचे प्रतिवर्षं दोन संच प्रतिवर्ष १ टी शर्ट व १ फ़ॉरमल ड्रेस देण्याची पद्धत यापुढेही चालू राहील. व या सुविधेव्यतिरिक्त तीन वर्षातुन एकदा ट्रॅकसुट देण्याचे मान्य केले आहे.
एखादा कायमस्वरूपी कामगार मृत पावल्यास कुटुंबीयांस मदत निधी म्हणून कायम असोसिएट्स कडुन एक दिवसाचे ठोक वेतन व कायम असोसिएट्स कडुन जमा झालेल्या ठोक रक्कमेच्या दुप्पट रक्कम कंपनीकडून सहभाग म्हणून देण्यात येईल.
ग्रॅच्युइटी : ग्रॅच्युइटी १६ दिवसा प्रमाणे कामगारास दिली जाईल.
१० वर्ष सेवा कालावधी पारितोषिक रक्कम रु.११०००/-देण्यात येईल.
१५ वर्ष सेवा कालावधी पारितोषिक रक्कम रु.१८०००/-देण्यात येईल.
२० वर्ष सेवा कालावधी पारितोषिक रक्कम रु.२००००/-देण्यात येईल.
२५ वर्ष सेवा कालावधी पारितोषिक रक्कम रु.२५०००/-देण्यात येईल.
३० वर्ष सेवा कालावधी पारितोषिक रक्कम रु.३३०००/-देण्यात येईल.
३५ वर्ष सेवा कालावधी पारितोषिक रक्कम रु.३५०००/-देण्यात येईल.
सेवा निवृत्ती वय : कामगाराचे सेवानिवृत्ती वय ५८ वर्ष असेल.
बोनस : बोनस हा प्रतिवर्ष BASIC + DA + VDA च्या २०% इतका देण्यात येईल.
मिठाई : कामगारांसाठी दसरा सणानिमित्त १ किलो मिठाई दरवर्षी देण्यात येईल.
व्यवस्थपनाच्या वतीने (Director-Operations) मकरंद कुलकर्णी, (Sr. Director-Employee Relations) प्रकाश बिमलखेडकर, (Associate Director-Human Resources & IR) अमोल जोशी, (Manager Human Resources & IR) धनंजय लिंबेकर व तसेच संघटनेचे अध्यक्ष प्रकाश नवलू शिंदे, सेक्रेटरी रविंद्र प्रकाश बेल्हेकर, उपाध्यक्ष संजय नारायण माने व वैजनाथ नेहरकर, जॉइंट सेक्रेटरी प्रविण देवगुडे व भीमाशंकर कोळी, खजिनदार बाबासाहेब चितळे कार्यकारिणी सदस्य संपत पाटील, अंकुश पाटील, अनिल मुळीक आणि सुदाम जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.
हा करार यशस्वी करण्यामध्ये श्रमिक एकता महसंघ अरविंद श्रोती आणि अॅडव्होकेट नितीन कुलकर्णी सर यांनी विशेष सहकार्य केले.
सदर करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व कामगारांच्या संयमी भूमिकेमुळे हे यश मिळाल्याची भावना कामगारांनीही व्यक्त केली. करार झाल्यानंतर कामगारांनी फटाके वाजवून तसेच गुलालाची उधळन करुन आनंद व्यक्त केला.