ट्रॅक कंपोनन्ट्स लि. (Track Components Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

नाशिक : औद्योगिक वसाहती मधील ट्रॅक कंपोनन्ट्स लि. (Track Components Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये कासारवाडी, पुणे येथील हॉटेल कलासागर मध्ये  झालेल्या वेतनवाढ करारावरती आमदार पै. महेश लांडगे व पै. रोहिदास गाडे,  कामगार नेते जीवन येळवंडे,  जी.आर.आय. टॉवर इंडिया प्रा. लि. कोल्हापूर कंपनीचे डायरेक्ट रमेश म्हस्करंस व ट्रॅक कंपोनंन्ट्सचे सी.ई.ओ. राजेश खन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्यांचा कार्यक्रम सोमवार दिनांक २६/०६/२०२३ रोजी संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ट्ये :

एकूण पगार वाढ :   रु. 12,500/-

मेडिक्लेम पॉलीसी :  रु.1,00,000/- संपूर्ण खर्च कंपनी करणार, व जादाची 3,00,000/- रुपयांची बफर पॉलीसी

मृत्यू साहाय्य योजना :
अ) मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसांचा पगार आणि 2,50,000/- ( दोन लाख पन्नास हजार ) रुपये कंपनीकडून कायदेशीर वारसास मिळणार.
ब) एखाद्या कामगाराचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास युनियन सोबत चर्चा करून त्यास मदतनिधी व योग्य त्या ठिकाणी कामावर ठेवण्यात येईल.

ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी : रु.2,00,000/- (दोन लाख रुपये)

जर एखाद्या कामगाराचा कंपनीत कामावर असताना अपघात झाल्यास त्यामुळे त्याचे काही काळा नंतर उद्भवणाऱ्या आजाराचा खर्च पूर्णपणे कंपनी करणार.

जर एखाद्या कामगाराचा किंवा त्याच्या कुटुंबीयाला मोठ्या आजारामुळे जास्त खर्च आल्यास तर कंपनी ने सर्वच्या सर्व खर्च म्हणजेच 100% रक्कम देण्याचे मान्य केले आहे व त्याची कपात ही संघटनेशी चर्चा करून कापण्यात यावी.

रजा : A) PL - 15, B) SL - 08, C) CL - 08, D) PH - 10, E)मतदानाची सुट्टी सरकारी आदेशानुसार राहील, F) शॉर्ट लिव्ह - एका महिन्यात दोन वेळा देण्याचे मान्य,

मासिक हजेरी बक्षीस : ज्या कामगाराचे मासिक हजेरी पूर्ण दिवस भरतील त्यास रु.600/- रक्कम बक्षीस देण्यात येईल तसेच ज्या कामगारांची फक्त 1 दिवस सुट्टी असेल. तर त्यास रु.300/- बक्षीस देण्याचे मान्य केले आहे.

कॅन्टीन सुविधा : कॅन्टीन सुविधा सर्व कामगारांना  नाष्टा देण्याचे मान्य केले तसेच मेनू हा संघटनेशी चर्चा करून ठरवण्याचे मान्य केले.

दिवाळी बोनस : रु.12,600/- वार्षिक बोनस म्हणून देण्यात येईल, व एक भेट वस्तू देण्यात येईल.

वैयक्तिक कर्ज सुविधा : प्रत्येक कामगारास रु.25,000/- ( पंचवीस हजार) रुपये देण्याचे मान्य.

वार्षिक स्नेह संमेलन : प्रत्येक वर्षी वाढीव स्वरूपात करण्याचे मान्य.

प्रत्येक कामगाराला प्रत्येकी 15 महिन्याचा फरक देण्यात येणार आहे.

    करारावरती  संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै. महेश लांडगे, पै. रोहिदास गाडे, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, उपाध्यक्ष शामभाऊ सुळके, सहचिटणीस रघुनाथ मोरे, खजिनदार अमृत चौधरी, माथाडी कामगार नेते किसनराव बावकर, तेजश बीरदवडे, महिंद्रा लॉजीस्टिक युनिट अध्यक्ष प्रशांतआप्पा पाडेकर, महादेव येळवंडे, रविंद्र भालेराव, यूनिट अध्यक्ष चेतन सूर्यवंशी, उपाध्यक्ष रुपेश ढाके, सरचिटणीस समीर शेख, सहचिटणीस शशिकांत माळी, खजिनदार राकेश गिराशे, चाकण यूनिट अध्यक्ष दिपक बऱ्हाटे,  उपाध्यक्ष मिंन्टू कुमार, सरचिटणीस प्रवीण वाडेकर, सहचिटणीस अनिल कुंभार, खजिनदार सवाई सिंह, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे सी.इ.ओ. राजेश खन्ना, प्लांट हेड.महेंद्र पाटील, चाकण प्लांट हेड गिरीश भेंडगावे, एच आर मॅनेजर अविनाश चोरमाले, पर्चेस मॅनेजर स्वप्निल मौले यांनी सह्या केल्या.

    संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै. महेश लांडगे, अध्यक्ष जीवन येळवंडे व कंपनी सी.ई.ओ. राजेश खन्ना यांनी उपस्थित कामगार बंधू व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले, व प्रस्ताविक एच.आर.मॅनेजर अविनाश चोरमले यांनी केले, तसेच पुजाताई थिगळे यांनी सूत्रसंचालन केले व सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कामगारांनी पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्यक्त केला.